शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आता एकच सिगरेट मिळणार नाही; दारू विक्रीवरही नवे निर्बंध? संसदीय समितीची केंद्र सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:08 IST

स्मोक फ्री सिगरेटवर करांत ९० टक्के वाढ केली पाहिजे. या करवाढीमुळे ४१६ अब्ज रुपयांचा महसूल सरकारला मिळू शकले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सुट्या सिगरेट विक्रीवर बंदी घालावी, अशी शिफारस संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला केली आहे. एकावेळी केवळ एकच सिगरेट विकत घेणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या असून, त्यामुळे सिगरेटचा एकूण खपदेखील अधिक आहे. त्यामुळे तंबाखू पदार्थांच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या मोहिमेवर परिणाम होत आहे, असे समितीने म्हटले आहे.

तंबाखूजन्य उत्पादनांवरील कर वाढविण्याची, तसेच सर्व विमानतळांवरील स्मोकिंग झोन बंद करावे, अशी शिफारसही या समितीने केली आहे. तिने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जीएसटी लागू झाल्यानंतर तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांमध्ये फार वाढ झालेली नाही. या समितीने मद्याच्या विक्रीवरही आणखी काही निर्बंध लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. 

कॅन्सरची शक्यता...आगामी अर्थसंकल्पात तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असे संसदीय समितीने इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संघटनेच्या अहवालाचा हवाला देऊन म्हटले आहे. 

सुगंधित तंबाखूवरही हवे अधिक निर्बंधगुटखा, सुगंधित तंबाखू तसेच माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवरदेखील अधिक निर्बंध लादणे आवश्यक आहे. तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांत वाढ झाल्यानंतर त्यांच्या विक्रीत घट होण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा परिणाम कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होण्यात झाला तर ते उत्तम होईल, असे कॅन्सर तज्ज्ञांनी म्हटले आहे. तंबाखू उत्पादनांवर कर आणखी वाढविण्यात आले पाहिजे, असे काही अर्थतज्ज्ञांचेही मत आहे.

व्हाॅलेन्टरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे की, एक विडी व एका सिगरेटची किमान किंमत अनुक्रमे एक रुपया व बारा रुपये करणे आवश्यक आहे. स्मोक फ्री सिगरेटवर करांत ९० टक्के वाढ केली पाहिजे. या करवाढीमुळे ४१६ अब्ज रुपयांचा महसूल सरकारला मिळू शकले.  

टॅग्स :Cigaretteसिगारेट