नवी दिल्लीः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात प्रसिद्ध व्यक्तींमधले एक आहेत. मोदी हे कायमच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. सोशल मीडियावर प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवर मोदींचे फॉलोअर्सही कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे मोदींना आता अमेरिकेतलं व्हाइट हाऊसदेखील फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेचं सत्ताकेंद्र असलेलं व्हाइट हाऊस फॉलो करत असलेले मोदी हे जगातील एकमेव नेते ठरले आहेत. व्हाइट हाऊसचं ट्विटर अकाऊंट मोदी सोडल्यास इतर कोणत्याही जागतिक नेत्याला फॉलो करत नाही. व्हाइट हाऊस फक्त १९ ट्विटर अकाऊंटला फॉलो करते. यातील १६ अमेरिकेतील आहेत, तर तीन भारतातील ट्विटर अकाऊंट आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदीं (@narendramodi)च्या वैयक्तिक अकाऊंटसह व्हाइट हाऊसचं ट्विटर अकाऊंट पीएमओ इंडिया (@PMOIndia), भारताचे राष्ट्रपती (@rashtrapatibhvn), यूएस दूतावास इंडिया (@USAndIndia) आणि यूएसएमधील भारताच्या (@IndianEmbassyUS) दूतावासाला फॉलो करते.कोरोना व्हायरसशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेला भारतानं मोठी मदत केली आहे. अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची सर्वात अधिक गरज होती, तेव्हा भारतानं त्यांना ते उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळेच कदाचित आता व्हाइट हाऊसदेखील भारताचा फॉलोअर्स झाला असावा.कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने मलेरियासाठी रामबाण ठरत असलेलं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनची निर्यात थांबविली होती. कारण हे औषध कोरोनाग्रस्तांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास फायदेशीर ठरत आहे.
ना पुतीन, ना किम, ना जिनपिंग; व्हाईट हाऊस फॉलो करत असलेले एकमेव नेते ठरले PM नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:54 IST