शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 17:19 IST

EC on EVM OTP Unlock Case: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे.

मुंबईतील शिवसेनेचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याने ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. यावरून निवडणूक आयोगाने आज मोठा खुलासा केला आहे. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही, असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांना केवळ ४८ मतांनी विजय मिळाला आहे. या मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करताच निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. यावर आयोगाने विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर दिले आहे. 

निवडणूक आयोगाच्यावतीने रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही. तसेच ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही, असे सांगितले आहे. आज आलेल्या बातम्यांवरून काही लोकांनी ट्विट केले आहे. चुकीची बातमी प्रसिद्ध केली आहे. ईव्हीएम ही स्वतंत्र प्रणाली आहे. आम्ही चुकीची बातमी दिल्यावरून वृत्तपत्राला नोटीस पाठविली आहे. आयपीसी 499 अंतर्गत मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या. 

मी त्या पत्रकाराला समजविण्याचा प्रयत्नही केला होता. त्यांना आयपीसी ५०५ आणि ४९९ नुसार नोटीस पाठविली जाणार आहे. आयोगाचा अधिकारी गौरव यांना जो मोबाईल ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती तो त्यांचा स्वत:चा मोबाईल होता. पोलीस तपासानंतर आम्हीही अंतर्गत तपास करणार की नाही ते ठरविणार आहोत, असे त्या म्हणाल्या. 

काय झाले आतापर्यंत...पोलिसांनी वायकरांचा मेहुणा मंगेश पंडीलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाचा कर्मचारी  दिनेश गुरव याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश पंडीलकर हे मतमोजणीच्या खोलीत मोबाईल वापरत असल्याची तक्रार इतर उमेदवारांनी केली होते. त्यानंतर पोलिसांनी ४ जून रोजीच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला होता. आता पोलीस तपासात पंडीलकर हे ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी हा मोबाईल वापरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. हे फुटेज पोलीस आजपासून तपासणार आहेत. या फोनमधील नंबरचा सीडीआरही तपासला जात आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEVM Machineएव्हीएम मशीनRavindra Waikarरवींद्र वायकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४