शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
3
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
4
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
5
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
6
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
7
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
8
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
9
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
10
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
11
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
12
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
13
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
14
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
15
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
16
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
17
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
18
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
19
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
20
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

NRC नंबर द्या, अन्यथा Aadhaar Card बनणार नाही; भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 09:09 IST

आता आधार कार्ड बनवण्यासाठी अर्जदारांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच एनआरसी (NRC) अर्ज पावती क्रमांक (ARN) सबमिट करावा लागणार आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी (दि.७) मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार आधार कार्ड बनवण्याबाबत आणखी कठोर झाले आहे, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले. आता आधार कार्ड बनवण्यासाठी अर्जदारांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच एनआरसी (NRC) अर्ज पावती क्रमांक (ARN) सबमिट करावा लागणार आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी एक तपशीलवार मानक संचालन प्रक्रिया (SOP) तयार केली जाईल आणि ती १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू केली जाईल. एनआरसीची अर्जाचा पावती क्रमांक सबमिट केल्याने बेकायदेशीर परदेशी लोकांचा ओघ थांबेल आणि आधार कार्ड जारी बनवताना राज्य सरकार खूप काटेकोर नियमांचे पालन करेल. दरम्यान, आधार कार्डसाठी अर्ज करणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने खूप जास्त आहेत, यावरून राज्यात संशयास्पद नागरिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आसाम सरकारला आधार कार्डसाठी NRC अर्जाचा पावती क्रमांक सादर करावा लागणार आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांच्या मते, आसाममध्ये आता आधार कार्ड मिळवणे सोपे होणार नाही. इतर राज्येही आधार कार्ड देण्याबाबत कडक भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. एनआरसी अर्ज पावती क्रमांक सादर करणे, त्या ९.५५ लाख लोकांसाठी लागू होणार नाही, ज्यांचे एनआरसी प्रक्रियेदरम्यान बायोमेट्रिक्स लॉक करण्यात आले होते, ज्यांना त्यांची कार्डे मिळतील. तसेच, ही प्रक्रिया चहाच्या मळ्यांच्या भागात लागू होणार नाही. कारण पुरेशा बायोमेट्रिक मशीन्सच्या अनुपलब्धतेसारख्या काही अडचणींमुळे तेथील लोकांना आधार कार्ड मिळालेले नाहीत.

एनआरसी अर्जाचा पावती क्रमांक सबमिट केला तरच मिळेल आधार कार्ड आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील असे चार जिल्हे आहेत, जिथून अंदाजे लोकसंख्येपेक्षा आधार कार्डसाठी जास्त अर्ज आले आहेत. या चार जिल्ह्यांतील बारपेटा येथे १०३.७४ टक्के, धुबरी येथे १०३ टक्के, मोरीगाव आणि नागाव या दोन्ही ठिकाणी १०१ टक्के अर्ज आले आहेत. आधार कार्ड कोणत्याही व्यक्तीला देता येईल की नाही, हे ठरवण्याचा अधिकार केंद्राने राज्य सरकारांना दिला आहे. अशा स्थितीत आसाम सरकारने निर्णय घेतला आहे की, संबंधित जिल्हा आयुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, तेव्हाच नवीन अर्जदारांना आधार कार्ड दिले जातील. या प्रमाणपत्रांचीही बारकाईने छाननी केली जाणार आहे. अर्जदाराकडे एनआरसी एआरएन असल्यास, तो २०१४ पूर्वी राज्यात होता, हे स्पष्ट होते.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAssamआसाम