शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 18:09 IST

अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

फेसबुक फ्रेंडसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहे. नसरुल्ला आणि अंजूचा निकाह झाल्याचं समोर आल्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंजूने तिचं नाव आता बदलून फातिमा असं केलं आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्याचं देखील म्हटलं जात आहे. तेव्हापासून अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेल्याचे अरविंदने सांगितले. जर ती परत आली तर तो तिला स्वीकारणार नाही. तो म्हणाला की, ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कोणालाही सांगितलं नाही. अरविंदने सांगितले की, मुलंही आईवर खूप नाराज झाली आहेत. मुलीने तर सांगितले आहे की पत्नीला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचं तोंडही पाहायचं नाही. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.

अरविंदने सांगितले की, त्याचे आणि अंजूचे नाते चांगले होते. मोठं भांडण झालं नाही. प्रत्येक पती-पत्नीमध्ये काही ना काही भांडण होत असतं. तो म्हणाला की मी कुठेही गायब झालो नाही. मला मीडियापासून दूर राहायचे होते. मी थकलो आहे. माझी तब्येत बरी नाही. अरविंदला विचारले असता अंजूच्या वडिलांनी सांगितले होते की मुलगी विक्षिप्त आहे, हट्टी आहे, तिला पाहिजे ते करते, पण लग्न करणार नाही. 

अरविंदने सांगितले की, सोशल मीडियावर जे दिसत आहे त्यानुसार अंजूचा निकाह झाला आहे. इथेही ती खोटं बोलत होती, तिथूनही खोटं बोलत आहे. ती सर्व काही करत आहे. ती मुलांशीही बोलली, ती त्यांच्याशीही खोटे बोलत आहे. अंजूला अनेक छंद होते. भरपूर पैसे खर्च करायची. त्याच्यावर कर्जही आहे. अंजूच्या वागण्यावर अरविंद म्हणाला की, ती जे ठरवते ते ती करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान