शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

'डॉलरच्या तुलनेत रुपया 80 वर पोहोचला तरी चिंता नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:53 IST

रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण 

नवी दिल्ली: रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपयानं सत्तरी ओलांडली आहे. मात्र असं असलं तरी लोकांनी चिंता करु नये, असं आवाहन मोदी सरकारकडून करण्यात आलं आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 80 वर पोहोचला तरी, चिंता करण्याचं कारण नाही, असं आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे. रुपयाचं मूल्य घसरण्यासाठी देशाबाहेरील घडामोडी जबाबदार असल्याचंही ते म्हणाले. काल रुपयानं ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपया 70 वर पोहोचला. तुर्कस्थानचं चलन असलेलं लिरा घसरल्याचा परिणाम जगभरात पाहायला मिळाला. भारतही याला अपवाद नाही. आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आंतरराष्ट्रीय अर्थविश्वात घडणाऱ्या याच घडामोडींचा संदर्भ दिला. 'देशाबाहेर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपया घसरला आहे. त्यामुळे आपण चिंता करण्याचं कारण नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल,' असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला. यंदाच्या वर्षात रुपयाचं मूल्य 9 टक्क्यांनी घसरलं आहे. आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या चलनात इतकी मोठी घसरण झालेली नाही. विशेष म्हणजे एकट्या ऑगस्ट महिन्यात रुपयाचं मूल्य 5 टक्क्यांनी घसरलं आहे. मात्र रुपयाची स्थिती लिरा आणि रुबलपेक्षा चांगली आहे. तुर्कस्थानचं चलन असलेल्या लिराच्या मूल्यात ऑगस्ट महिन्यात 28 टक्क्यांची घट झाली आहे. तर रशियाचं चलन असलेलं रुबल याच महिन्यात 15 टक्क्यांनी घसरलं आहे. रुपयाच्या मूल्यातील घसरण टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रुपयाचं मूल्य घसरलं असल्यानं आरबीआयच्या प्रयत्नांना मर्यादित यश मिळताना दिसतं आहे.  

टॅग्स :businessव्यवसाय