शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'जग काहीही म्हणो, आम्हाला तुझा अभिमान...' सोनियांसाठी प्रियांका गांधींची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 20:18 IST

काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज हाती घेतली.

नवी दिल्ली -काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज हाती घेतली. यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. दोन दशकानंतर काँग्रेसला गैर गांधी अध्यक्ष मिळाला आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गेंकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपवल्यानंतर काही तासांतच प्रियांका गांधी वाड्रा यांनी आई सोनियासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सोनिया गांधी सर्वाधिक काळ पक्षाच्या अध्यक्षा होत्या. 24 वर्षानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. आज पदभार स्विकारल्यानंतर खर्गे यांनी सोनिया गांधींना राजीव गांधींचा फोटो भेट दिला. फोटो हातात घेतल्यानंतर सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. दरम्यान, प्रियांका गांधींनी सोनिया गांधी हातात राजीव गांधी यांचा फोटो घेतलेला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत प्रियंका लिहितात की, "आई, आम्हाला तुझा अभिमान आहे. जगाने काहीही म्हणावे, किंवा काय विचार करते याने काही फरक पडत नाही. आम्हाला माहितये तू सर्वकाही प्रेमसाठी केलंस." प्रियांका गांधी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये 75 वर्षीय सोनिया गांधी हातात पती राजीव गांधी यांचा फोटो घेऊन उभ्या आहेत.

सोनिया गांधी 1998-2017 पर्यंत आणि नंतर 2019-22 पर्यंत पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा होत्या. त्यांनी 1968 मध्ये राजीव गांधींशी लग्न केले होते. राजीव गांधींची 21 मे 1991 मध्ये श्रीपेरंबदूरमध्ये हत्या झाली. सोनिया गांधी सुरुवातीला राजकारणापासून लांब होत्या. पण, पतीच्या मृत्यूनंतर 1997मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधी