शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनाऱ्यांवरील पुरुषांची नग्नता रोखा; महिला आयोगाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 17:43 IST

गेल्या महिन्यात मी गोकर्ण येथे गेले होते, त्यावेळी काही पुरुष तेथील बीचवर नग्नवस्थेत फिरताना आम्हाला दिसले.

बंगळुरू - कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पत्र लिहून समुद्र किनाऱ्यावरील पुरुषांच्या नग्न फिरण्याला आक्षेप घेत ठोस भूमिका घेण्याची विनंती केली आहे. तसेच बीचवर फिरण्यासाठी पुरुषांना ड्रेसकोड ठरवून द्यावा, असेही एनजी नागालक्ष्मीबाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. गोकर्णा बीचवर काही पुरुषांना नग्न अवस्थेत फिरतानाच्या पाहण्यात आले होते. त्यामुळे नागालक्ष्मीबाई यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. 

गेल्या महिन्यात मी गोकर्ण येथे गेले होते, त्यावेळी काही पुरुष तेथील बीचवर नग्नवस्थेत फिरताना आम्हाला दिसले. त्या पुरुषांनी थोडे तरी कपडे आपल्या अंगावर चढवायला हवे होते, असे नागालक्ष्मीबाई यांनी मुख्यमत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बीचसारख्या पर्यटन ठिकाणावर पुरुषांचे असे बिनधास्त वागणे हे केवळ महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक नसून तेथील सुरक्षेचाही महत्वाचा प्रश्न आहे. तसेच, तेथील बीचवर अनेक लहान मुलांसह, महिला आणि तरुण मुलीही फिरतात. विशेष म्हणजे या बीचवर काही तरुण मुली उदरनिर्वाहासाठी वेगवेगळी दुकाने चालवतात. त्यावेळी या मुलींना पुरुषांच्या बिनधास्त वागण्याचा त्रास होतो. तसेच कित्येकदा या मुलींचा विनयभंगही करण्यात आल्याच्या तक्रारी मुलींनी केल्या आहेत. त्यामुळे या बीचवर अधिकची पोलीस सुरक्षा वाढविण्याची मागणीही नागालक्ष्मीबाई यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. 

कर्नाटकमध्ये 22 बीचेस आहेत. त्यामुळे राज्यातील वाढत्या पर्यटनाची, देशाच्या संस्कृतीची दखल घेऊन पुरुषांना बीचवर नग्न फिरणे बंद करावे, शिवाय याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा, कर्नाटकची ओळख नग्न बीचसाठी प्रसिद्ध ठिकाण अशी व्हायला वेळ लागणार नाही, असेही नागालक्ष्मीबाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :WomenमहिलाKarnatakकर्नाटकSea Routeसागरी महामार्गkumarswamyकुमारस्वामी