शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:51 IST

चार हजार साधुसंतांसह आठ हजार खास लोकांना पाठविणार निमंत्रण

- संजय शर्मा/राजेंद्र कुमारनवी दिल्ली/अयाेध्या : अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी देशातील कोणतेही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपालांसह कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिले जाणार नाही. श्री राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. अर्थात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमास उपस्थित राहतील. ते आयोजन समितीत आहेत.रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, राममंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी ८००० विशिष्ट लोकांना निमंत्रण पाठविण्यात येईल. यात ४००० साधुसंतांचा समावेश असेल. सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमात मुख्य अतिथी असणार आहेत. आंबेकर यांनी सांगितले की, संघ व विहिंप कार्यकर्ते एक जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत देशाच्या प्रत्येक गावात, शहरात राम मंदिराच्या छायाचित्रासह अक्षता घेऊन निमंत्रण देण्यास जाणार आहेत. राममंदिर आंदोलनाशी संबंधित सर्व प्रमुख लोकांना बोलावण्यात येणार आहे. नेत्यांना निमंत्रण न देण्यामागचे कारण सांगताना अंबेकर म्हणाले की, मंदिराचे काम अद्याप पूर्ण नाही. व्हीआयपीच्या येण्याने व्यवस्थेवर ताण पडू शकतो.

अयोध्या सजली : अयोध्येतील रामजन्मभूमी येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिरातील गर्भगृहात दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांच्या हारांची सजावट करण्यात आली आहे. तसेच भगव्या रंगाच्या पताकांनी हा परिसर सुशोभित केला आहे. राममंदिराच्या उभारणीत व्यग्र असलेल्या कामगारांनीही या मंदिरात सजावट करण्यास हातभार लावला. अयोध्येतील शरयू तीरावर लाखो पणत्या उजळून यावेळीही विक्रम करण्यात येणार आहे. त्याची तयारी झाली आहे. 

काँग्रेसच्या दाव्यावर आरएसएसला नाही आक्षेपअंबेकर म्हणाले की, एक जानेवारीपासून पूर्ण देशात राममय वातावरण तयार होत आहे. ५०० वर्षांच्या लढाईनंतर हा शुभ दिन येत आहे. आता काँग्रेसचे नेतेही दावा करत आहेत की, राममंदिर आमच्यामुळे झाले आहे. राजीव गांधी यांनी त्यावेळी कुलूप उघडले होते. अंबेकर म्हणाले की, संघाला या दाव्याबाबत कोणताही आक्षेप नाही. संघ व विहिंपने हा मुद्दा हाती घेऊन निष्कर्षापर्यंत नेला.

योगी आदित्यनाथ यांना निमंत्रणश्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. स्वामी गोविंद देव गिरी महाराज, चंपतराय, राजेंद्र पंकज यांनी शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली व त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज जीवन धन्य झाले. मन प्रफुल्लित झाले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी स्वामी गोविंद देव गिरी महाराज, चंपत राय व राजेंद्र पंकज यांनी प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण दिले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या