शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

फास्ट फूडला फाटा; घराघरांत चवदार खमंग पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:55 IST

कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे दिल्ली चाटसह फास्ट फूड जवळपास हद्दपार झाले असून, घराघरांत खमंग पदार्थांची रेलचेल आहे. याचा परिणाम वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या रेसिपी किचनमध्ये तयार होत आहेत. परिणामी, सकस आहार मिळाल्याने प्रतिकारक्षमता वाढण्यास मोठी मदत मिळत आहे.दाबेली, रगडा पॅटिस, सँडविच, पाणीपुरी, कचोरी, समोसा, पॅटिस, बर्गर, पिझ्झा या आणि असे कितीतरी ‘दिल्ली चाट’ दिल्लीकरांच्या जगण्याचा जणू महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून एकदा, एक दिवसाआड किंवा आठवड्यातून किमान तीन दिवस ‘चाट’ची चव दिल्लीकर चाखतात. काही जणांच्या बाबतीत तर हे प्रमाण अधिक आहे. चविष्ट आणि चमचमीत असलेले हे फास्ट फूड जिभेचे चोचले पुरविणारे असले तरी ते आरोग्याला मात्र हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत फास्ट फूड हे दिल्लीकरांच्या आहारातील महत्त्वाचा घटक बनले आहे. परिणामी, दिल्ली चाट हे संपूर्ण भारतातच ख्यात असून ते आता देशाच्या अन्य भागांतही उपलब्ध होऊ लागले आहे.मात्र, कोरोना विषाणूमुळे झालेले लॉकडाऊन दिल्ली चाटवरही परिणाम करणारे ठरले आहे. घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्याने फास्ट फूड दिल्लीतून जवळपास हद्दपार झाले आहे. घराघरांत असलेली कुटुंबे मात्र वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ बनवीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दिल्ली चाट किंवा फास्ट फूडची जागा पारंपरिक आणि सकस आहाराने घेतली आहे. गहू, बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून तसेच, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची घरातील किचनमध्ये रेलचेल आहे.कोरोना विषाणूच्या संकटात आपली प्रतिकारक्षमता टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. आणि याच काळात सकस आहाराच्या मेजवानीतून शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत आहेत. त्यामुळे कोनोराचा मुकाबला करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत फरिदाबादमधील डॉ. राहुल रावत यांनी व्यक्त केले आहे.पोहे, उपमा, ढोकळा, इडलीची लॉकडाऊनमध्ये रेलचेल४सध्या आम्ही घरातच असलो तरी मुगाच्या डाळीची खिचडी, डाळींपासून बनविले जाणारे शेंगोळे, विविध प्रकारचे थालीपीठ, पराठे, पोहे, उपमा, शिरा, खमंग ढोकळे, इडली, डोसे यासह विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा घराघरांत घमघमाट आहे. आम्ही घरगुती मॅगी बनवून मुलांना दिली. त्यांना ती आवडली, असे आयपी एक्स्टेंशन येथे राहणाºया शिनकर कुटुंबाने सांगितले आहे.४सध्या विविध प्रकारच्या डाळींचे पदार्थ आम्ही बनवीत असल्याचे प्रीतविहार येथील लोखंडे परिवाराचे म्हणणे आहे. आईच्या हातचे अनेक पदार्थ बºयाच वर्षांनी पुन्हा खायला मिळत आहे. त्याची चव काही भन्नाटच असल्याचे मत ‘मयूर विहार’ मधील जोशी कुटुंबाने व्यक्त केले आहे.