शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'आधार'  रद्द करण्याचा विचार नाही - सर्वोच्च न्यायालय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 20:29 IST

खासगी आयुष्याचा अधिकार  हा मुलभूत अधिकार आहे की नाही, या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्व वाद प्रतिवाद विचारात घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आधार रद्द करण्याचा विचार नसल्याचे सांगितले. 

नवी दिल्ली, दि. 1 - खासगी आयुष्याचा अधिकार  हा मुलभूत अधिकार आहे की नाही, या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्व वाद प्रतिवाद विचारात घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आधार रद्द करण्याचा विचार नसल्याचे सांगितले. आधार संबंधीच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना आज महाराष्ट्र सरकारने न्यायालय खासगी आयुष्याच्या अधिकाराचा संविधानानुसार मुलभूत अधिकारात समावेश करू शकत नाही. असे करण्याचा अधिकार केवळ संसदेस आहे.  खासगी जीवनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही, असे सांगत बाजू मांडली. महाराष्ट्र सरकारकडून सी.ए. सुंदरम यांनी बाजू मांडली. खासगीपणाचा अधिकार हा मुलभूत अधिकार नाही. त्याला मुलभूत अधिकाराचा दर्जा द्यायचा असल्यास संसद घटनादुरुस्ती करू शकते. खासगीपणाच्या अधिकाराला अन्य कायद्यांद्वारे संरक्षित करण्यात आले आहे. असा युक्तिवाद सुंदरम यांच्याकडून करण्यात आला. यावेळी यूआयडीएआयच्यावतीने  युक्तिवाद करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, आधारमधून जी माहिती घेण्यात आली आहे तिचा वापर सरकारी यंत्रणासुद्धा करण्याचा प्रयत्न करेल तर ते सुद्धा अशक्य आहे. आघार अॅक्टनुसार ही माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे  घटनाकारांनी काही विशिष्ट्य उद्देशाने खासगीपणाच्या अधिकाराला मुलभूत अधिकारातून बाहेर ठेवले आहे. मात्र खासगीपणाचा अधिकार अन्य अधिकारांद्वारे संरक्षित करण्यात आला आहे. असा युक्तिवाद सुंदरम यांनी केला. मात्र न्यायमूर्ती जे. चेलामेश्वर यांनी या युक्तिवादाशी असहमती दर्शवली. तसेच न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनीही संविधान सभेतील चर्चेला मर्यादित चौकटीत मांडत आहात असे सुंदरम यांना सांगितले. मात्र यावेळी आधार रद्द करण्यात येणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.