शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion : राहुल गांधी यांच्या भाषणावेळेस गदारोळ, मोदींवरील आरोपांमुळे सत्ताधारी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:44 IST

अविश्वास ठरावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट आरोप केले.

नवी दिल्ली- अविश्वास ठरावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट आरोप केले. राफेल विमान खरेदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेऊन त्यात गैरव्यवहार केला असा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.  त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. 

राफेल विमानाच्या खरेदीमध्येही घोटाळा झाला असून, मोदी सरकारच्या काळात अचानक प्रत्येक विमानाची रक्कम 500 कोटीवरुन 1600 कोटी रुपये झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या विमानाची किंमत सांगण्यास नकार दिला. फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये  झालेल्या करारामुळे माहिती देता येत नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून याबाबत माहिती विचारली असता असा कोणताही करार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निर्मला सीतारामन खोटे बोलल्या आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांवर केला. यावर संरक्षण मंत्री सीतारामन आणि भाजपाच्या खासदारांनी विरोध केला आणि आक्षेप घेतला.

राफेल घोटाळ्यातून एका विशिष्ट उद्योजकाला हजारो कोटींचा फायदा झाला, असा थेट आरोपही राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशिष्ट उद्योजकाला का मदत केली हे स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी दिले. राहुल गांधी यांच्या या आरोपामुळे सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण तयार झाले. पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाहीत हे सगळ्या देशाने पाहिले आहे. 

चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बसून पंतप्रधान अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर बसून झोके घेत होते तेव्हा चीनचे हजार सैनिक भारतात घुसले होते. चीनचे राष्ट्राध्य जिनपिंग परत गेले आणि डोकलाममध्ये त्यांनी सैनिक पाठवले. पुन्हा मोदी चीनमध्ये गेल्यावर डोकलाम मुद्दा सोडून चर्चा होणार असे जाहीर करुन त्यांनी चीनच्या मतानुसारच चर्चा चालवली असा आरोपही राहुल यांनी मोदीवर केला.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा