शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

No Confidence Motion : मोदी सरकार हे 21व्या शतकातील ''जुमलास्त्र''

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:42 IST

तेलगू देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला, भारतीय जनता पार्टीचे खासदार राकेश सिंग यांनी आपापल्या पक्षांची बाजू अविश्वास दर्शक ठरावात मांडली.

नवी दिल्ली - तेलगू देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला, भारतीय जनता पार्टीचे खासदार राकेश सिंग यांनी आपापल्या पक्षांची बाजू अविश्वास दर्शक ठरावात मांडली. यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसची बाजू लोकसभेत मांडताना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारचा उल्लेख जुमला स्ट्राइक, असा करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळावर टीका केली. 

तेलगू देसमचे गल्ला यांच्या भाषणामध्ये मला दुःख दिसले. तुम्ही 21 व्या शतकातील राजकीय शस्त्राचे बळी आहात. तुमच्या सारखे अनेक या शस्त्राला बळी पडले आहेत. या शस्त्राचे नाव जुमला स्ट्राईक असे आहे. या देशाचे शेतकरी, तरुण लोक, दलित, आदिवासी आणि महिला या  जुमला स्ट्राइकचे बळी आहेत. असे सांगत राहुल गांधी यांनी मी मोदी सरकारचे काही जुमले वाचून दाखवतो असे सांगत प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये येणार हा पहिला जुमला आहे असे सांगितले होते तर  दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार मिळेल हा दुसरा जुमला होता असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात युवकांच्या रोजगाराची भाषा करत असतात. मात्र त्यांनी कदीच वचन पाळले नाही. ते कधी पकोडे तळायला सांगतात, कधी दुकान उघडायला सांगतात.

नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटाबंदीचा निर्णय घेतला. कदाचित त्यांना शेतकरी, गरिब आपला व्यवसाय नोटांमध्ये चालवत असतात हे त्यांना माहिती नव्हतं. सुरतला मी गेलो असताना तेथिल गरिबांनी नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी दुखापत नोटाबंदीच्या माध्यमातून आम्हाला केली. नरेंद्र मोदी नोटाबंदीवरच थांबले नाहीत. आम्ही देशभरात एक जीएसटी असेल, त्यात पेट्रोल-डिझेलचा त्यात समावेश असेल अशी मांडणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच प्रकारचे जीएसटी आणले आहेत. ते परदेशात जातात तेव्हा ते केवळ मोजक्या उद्योजकांना भेटतात, त्यांच्या मनात गरीब व्यक्तीला स्थान नसते. जिओच्या जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येते. काही ठराविक उद्योजकांसाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत, त्यांच्या हृद्यात गरिबांसाठी थोडीशीही जागा नाही अशी टीका राहुल यांनी केली.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी