शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना मृत घोषित करण्याचे पाप करणार नाही, मोसूलमधील भारतीयांबाबत सुषमांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 16:13 IST

इराकमधील मोसूस शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत विश्वसनीय माहिती सरकारकडे नाही. ते जिवंत आहे की मृत झालेत याबाबतचे पुरावेही नाहीत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले.

नवी दिल्ली, दि. 26 - इराकमधील मोसूस शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत विश्वसनीय माहिती सरकारकडे नाही. ते जिवंत आहे की मृत झालेत याबाबतचे पुरावेही नाहीत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले. जर त्यांच्याविषयी माहिती नाही तर त्यांना मृत घोषित का करण्यात येत नाही असा सवाल मला विचारण्यात येतोय. मात्र पुराव्याविना कुणालाही मृत घोषित करणे हे पाप आहे आणि ते पाप मी कधीही करणार नाही, असेही सुषमा यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहराची नुकतीच मुक्तता करण्यात आली आहे. येथूनच तीन वर्षांपूर्वी 40 भारतीयांचे अपहरण झाले होते. त्यातील एका अपहृताने स्वत:ची सुटका करून घेतल्यावर ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, तीन वर्षे लोटल्यानंतरही या भारतीयांबाबत पुरेशी माहिती सरकारला मिळालेली नाही. याबाबत संसदेत माहिती देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, मोसूलमधील 39 भारतीयांबाबत मी ते जिवंत आहेत किंवा मृत याबाबत कधीही वक्तव्य केलेले नाही.  प्रत्येक वेळी सभागृहाला विश्वासात घेत मी पुढे पाऊल टाकले."  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज विरोधी पक्षांची दिशाभूल करत असल्याच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. मोसूलमधील भारतीयांप्रकरणी मी दिशाभूल करत असल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. पण मी खरोखरच दिशाभूल करतेय का?  मी कधी सांगितले की ते जिवंत आहेत? मग मी त्यांना मृत घोषित का करत नाही, असा सवाल विचारला जात आहे. पण पुराव्याविना कुणालाही मृत घोषित करणे पाप आहे. ते पाप मी कधीही करणार नाही. "या प्रकरणात केवळ एक व्यक्ती सांगतेय की त्यांची हत्या झाली. तर आमची सहा सूत्रे सांगतात की त्यांना मारण्यात आले नाही. मग तुम्हीच सांगा मी काय केले पाहिजे. तसेच संबंधितांपर्यंत माझा थेट संपर्क झालेला नाही. त्यांच्या जिवंत असल्याचाही काही  पुरावा नाही. जेव्हा त्यांच्याबाबत काही सबळ पुरावा मिळेल तेव्हा मी सभागृहात येऊन माहिती देईन," असे सुषमा यांनी सांगितले.