शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! १८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं 'उड्डाण' घेणार, निर्बंध मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 16:59 IST

कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट लक्षात घेत केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे (Capacity caps) निर्बंध मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- 

कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट लक्षात घेत केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे (Capacity caps) निर्बंध मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशात आता १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान वाहतूक संपूर्ण प्रवासी क्षमतेनं होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० पासून शेड्युल आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. पण मे २०२० पासून 'वंदे भारत' मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली. याशिवाय निवडक देशांशी द्विपक्षीय 'एअर बबल' करार करुन जुलै २०२० पासून विमानसेवा सुरू आहे. 

देशांतर्गत विमान वाहतूक सध्या विमानाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ८५ टक्के क्षमतेनं सुरू आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार १८ सप्टेंबरपासून देशात ८५ टक्के प्रवासी क्षमतेनं विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती. याआधी ५ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत विमान वाहतूक ६५ टक्के क्षमतेनं, तर १ जून ते ५ जुलैपर्यंत ५० टक्के प्रवासी क्षमतेनं सुरू होती. आता प्रवासी क्षमतेवर असलेले निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAir Indiaएअर इंडिया