शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नितीशकुमार पुन्हा सक्रिय, ऐक्याच्या पंखांना बळ; काँग्रेसच्या होकारानंतर पाटण्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:41 IST

माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण भारतात असा कोणताही एक फॉर्म्युला चालू शकत नसल्याने राज्यनिहाय आघाडीचा विचार करावा.

हरीश गुप्तानवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ओडिशात जाऊन आपले समकक्ष नवीन पटनायक यांना भेटत असल्याने विरोधकांच्या ऐक्याच्या पंखांना बळ मिळाले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी नितीशकुमार प्रयत्नशील आहेत. नितीशकुमार यांनी यापूर्वीच विरोधी पक्षांच्या सहापेक्षा अधिक नेत्यांची भेट घेतलेली आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल, कोलकाता येथे ममता बॅनर्जी आणि लखनौमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचीही भेट घेऊन स्वीकारार्ह फॉर्म्युला तयार केलेला आहे. 

काँग्रेसने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवल्यानंतर आणि नितीशकुमार यांना अशी शक्यता पडताळून पाहण्यासाठी अधिकृत केल्यानंतर ते सक्रिय झाले आहेत. असे असले तरी पाटणा येथे बैठक घेण्याच्या नितीशकुमार यांच्या सूचनेला काँग्रेस हायकमांडने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी अशा बैठका राज्यांमध्येही घेता येतील, असे सुचविलेले आहे. मात्र, कर्नाटकच्या निवडणुकीनंतरच यावर विचार करू, असे काँग्रेसने स्पष्ट केलेले आहे. बिहार काँग्रेस प्रमुख आणि राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितले की, विरोधकांची बैठक पाटण्यात घेण्याबाबतचा निर्णय १५ मेनंतरच घेतला जाईल.

माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण भारतात असा कोणताही एक फॉर्म्युला चालू शकत नसल्याने राज्यनिहाय आघाडीचा विचार करावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस व इतरांशी हातमिळवणी करण्याची व ‘आप’ने निवडक जागा लढविण्याची तयारी दर्शवली आहे. २०१४मध्ये ‘आप’ने ४०० पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. तसेच २०१९मध्ये १०० पेक्षा कमी जागा लढवल्या होत्या.

नितीशकुमार यांनी भाजपशी संबंध तोडल्यानंतर काँग्रेस, जदयू महागठबंधनमध्ये आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांचा एकच उमेदवार देण्याच्या फॉर्म्युल्यावर नितीशकुमार विरोधी पक्षांशी चर्चा करीत आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार