शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नितीश कुमार घेणार नवव्यांदा शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:23 IST

Nitish Kumar News: महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.

इ.स. २००० मध्ये नितीशकुमार भाजपला सोबत घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. मात्र बहुमताअभावी त्यांना ७ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता. २००५ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१० मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते १४ वर्षे भाजपसोबत राहिले. २०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केल्यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली. मात्र, त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले.

२०१५ मध्ये ते महागठबंधनमध्ये गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. २०१७ मध्ये त्यांनी महागठबंधन सोडून भाजपसोबत घरोबा केला. २०२०ची निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा महागठबंधनसोबत गेले. जदयुला वगळल्यास महागठबंधनकडे ११४ आमदार आहेत. बहुमताचा १२२ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना फक्त ८ आमदार कमी पडतात. ‘हम’चे ४ आमदार आल्यास आणखी ४ आमदारांचीच गरज महागंठबनला भासेल. रालोआचे संख्याबळ १२७ आहे. 

लालूंना सर्वाधिकारराष्ट्रीय जनता दलाची (राजद) एक बैठक शनिवारी झाली. सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीतील निर्णयांची माहिती पक्ष प्रवक्ते मनोज झा यांनी नंतर पत्रकारांना दिली. या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले की, मी नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले आहे.

शपथविधीला अमित शाह येणारप्राप्त माहितीनुसार, नितीशकुमार हे रविवारी सकाळी ११.०० वा. राजभवनावर नव्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. नव्या सरकारमध्ये २ उपमुख्यमंत्री असतील.

खरगे यांच्याशी बोलणे टाळलेबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन घेण्याचे टाळले. त्यांची मनधरणी करण्यासाठी खरगे यांनी फोन केला होता, असे समजते. मागील २४ तासांपासून लालूप्रसाद यादव हे नितीशकुमार यांना फोन करण्याचा प्रयत्न करीत होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार