शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नितीश कुमार होणार जेडीयूचे अध्यक्ष, ललन सिंहांचा राजीनामा; बिहारमध्ये भूकंपाचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 13:40 IST

ललन सिंह हे जेडीयूच्या अध्यक्षपदावरून दूर होतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.

Nitish Kumar JDU ( Marathi News ) : जनता दल यूनायटेड (जेडीयू) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे पार पडत असून या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नितीश कुमार हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. ललन सिंह हे जेडीयूच्या अध्यक्षपदावरून दूर होतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब झालं असून सिंह यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत जेडीयू नेते आणि बिहारचे कॅबिनेट मंत्री विजयकुमार चौधरी यांनी माध्यमांसमोर माहिती दिली आहे.

"मी लोकसभा निवडणूक लढवणार असून या निवडणुकीत मी व्यग्र राहणार असल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं ललन सिंह यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितलं. त्यामुळे नितीश कुमार यांनी अध्यक्ष व्हावं असा प्रस्ताव आम्ही ठेवला असून हा प्रस्ताव स्वीकारल्यास नितीश कुमार हे जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होतील," अशी माहिती विजयकुमार चौधरी यांनी दिली आहे. 

बिहारमध्ये मोठी उलधापालथ होणार? काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत नितीश कुमार यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे. ललन सिंह यांच्या पुढाकाराने मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्यानेच ललन सिंह यांनी जेडीयूचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहार