शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:01 IST

जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम संघटना नाराज आहेत.

Bihar Election : बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहार काबी करण्यासाठी सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये जात आणि धर्म फॅक्टर खूप महत्वाचा आहे. अशातच, मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मुस्लीम समाजाकडून मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमारांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम धार्मिक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम संघटना संतप्त झाल्या असून, त्यांनी पहिल्यांदाच नितीश यांच्या इफ्तार पार्टीपासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. रविवारी पाटण्यात ही इफ्तार पार्टी होणार आहे.

बिहारमध्ये जेडीयूच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. भाजप, लोजपा (आर) आणि हिंदुस्थान अवाम मोर्चा देखील या सरकारचा भाग आहेत. केंद्रातील मोदी सरकार वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 आणण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मोदी मंत्रिमंडळाने संसदेच्या संयुक्त समितीने (JPC) प्रस्तावित केलेल्या 14 सुधारणांना मंजुरी दिली आहे. या दुरुस्त्या वक्फ मालमत्तेची नोंदणी, विवाद निपटारा प्रक्रिया आणि वक्फ बोर्डांच्या संरचनेशी संबंधित आहेत. विधेयकातील काही तरतुदींवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या विधेयकाला विरोध केला आहे.

मुस्लिम संघटनांनी काय निर्णय घेतला?जमियत उलेमा-ए-हिंद आणि इबादान-ए-शरिया या प्रमुख मुस्लिम संघटनांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर एनडीएचे मित्रपक्ष नितीश कुमार, एन चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान यांची भूमिका लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी इफ्तार, ईद मिलन आणि इतर कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इबादान शरिया, जमात इस्लामी, जमात अहले हदीस, खानकाह मोजिबिया, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा-ए-हिंद आणि खानकाह रहमानी या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकणाऱ्या संघटना आहेत. इतर मुस्लिम संघटनांपासून अंतर राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

आरजेडीची टीका आरजेडीने नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवरील बहिष्काराचे स्वागत केले आहे. इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकल्याबद्दल आरजेडीचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले की, मुस्लिम धार्मिक संघटनांचा निर्णय योग्य आहे. जेडीयू मुस्लिमांसोबत दुटप्पीपणाने वागत आहे. एकीकडे वक्फ विधेयकाला पाठिंबा आणि दुसरीकडे इफ्तारची मेजवानी...दोन्ही चालणार नाही. जेडीयू, टीडीपी आणि एलजेपी (आर) हे सर्व भाजपच्या अजेंड्यासोबत उभे आहेत.

जेडीयूने उत्तर जेडीयूचे प्रवक्ते नवल शर्मा म्हणाले, नितीश कुमार यांची धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करण्याची वचनबद्धता सर्वश्रुत आहे. बिहारमधील अल्पसंख्याकांचा सन्मान आणि उपजीविकेसाठी नितीशकुमार यांनी जी गंभीर काळजी दाखवली आहे, त्याचे उदाहरण गेल्या 20 वर्षांत नाही. नितीश कुमार गेली अनेक वर्षे इफ्तार पार्ट्या करत आहेत. ही काही नवीन गोष्ट नाही. पण ज्या राजदने आपल्या काळात बिहारमधील स्मशानभूमींवर कब्जा केला, मदरसा शिक्षकांना उपाशी ठेवले आणि भागलपूर दंगलीतील आरोपींना वाचवले, ते कोणत्या तोंडाने बोलत आहेत? असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारMuslimमुस्लीमRamzan Eidरमजान ईद