शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:11 IST

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.

Nitish Kumar ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हेच नितीश कुमार आता वेगळ्या विचारात असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून घोषित करावं, अशी मागणी नितीश कुमार यांच्याकडून केली जात होती. मात्र पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीतही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात असून ते इंडिया आघाडीपासून वेगळं होण्याचीही भूमिका घेऊ शकतात.

नितीश कुमार हे अलीकडच्या काळात भारतीय राजकारणात सतत बदललेल्या राजकीय भूमिकेसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. कधी भाजपा तर कधी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला सोबत घेत त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे.

२९ तारीख ठरणार महत्त्वाची!

नितीश कुमार यांच्या आगामी डावपेचांच्या दृष्टीने २९ डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. कारण २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. कारण ललन सिंह यांच्या पुढाकारानेच मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याने ललन सिंह हे काहीसे नाराज झाले असून ते अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊ शकतात.

जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहार