शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

इफ्तार पार्टीसाठी नितीशकुमार लालूंच्या घरी, तेजस्वी, तेजप्रताप यांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:05 IST

इफ्तार पार्टीच्या वेळी राबडीदेवी, मीसा भारती, राजश्री यादव, सय्यद शाहनवाज हुसेन, चिराग पासवान आदी उपस्थित होते.

एस. पी. सिन्हा -पाटणा : राजदने आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सहभागी झाले. चार वर्षांनी नितीशकुमार हे राबडीदेवींच्या घरी पायीपायीच यानिमित्ताने गेले. तेथे तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.इफ्तार पार्टीच्या वेळी राबडीदेवी, मीसा भारती, राजश्री यादव, सय्यद शाहनवाज हुसेन, चिराग पासवान आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री नितीशकुमार हे यापूर्वी तेजप्रताप यादव यांच्या विवाह समारंभात सहभागी झाले होते. त्यानंतर आज त्यांनी राजदच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यावेळी तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव यांनी नितीशकुमार यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. नितीशकुमार घरी आल्यामुळे लालूंच्या कुटुंबीयांना आनंद झाला. आजच लालूंना रांची हायकोर्टाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे २०१५ मध्ये लालू-नितीश यांनी एकत्रितरीत्या राज्यातील निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी नितीश यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनही झाले होते. तेव्हा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले होते. तथापि, त्यानंतर नितीश यांनी भाजपशी युती केली. तत्पूर्वी नितीशकुमार हे लालूंबरोबर दही खातानाची छायाचित्रे समोर आली होती. लालूंशी युती तोडून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर नितीशकुमार हे राबडीदेवींच्या निवासस्थानी गेले नव्हते. 

अमित शहांच्या दौऱ्याआधी...- नितीशकुमार इफ्तार पार्टीच्या निमित्ताने लालू-राबडींच्या घरी गेले, याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत. - केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे दिग्गज नेते अमित शहा बऱ्याच कालावधीनंतर बिहारच्या दौऱ्यावर येत आहेत. - त्यांच्या आगमनापूर्वी काही तास नितीशकुमार यांचे लालू-राबडींच्या घरी जाणे, चर्चेचा विषय बनले आहे. - यावेळी तेजस्वी यादव यांनी लालूंना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव