शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:09 IST

Nitish Kumar Hijab Controversy : १५ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर नुसरत परवीन यांनी कोलकाता येथील आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा बुरखा हटवल्याची घटना आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. या घटनेमुळे डॉक्टर नुसरत यांना मानसिक धक्का बसला असून, त्यांनी बिहार सोडून थेट कोलकाता गाठले आहे. विशेष म्हणजे, ज्या सरकारी नोकरीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ती नोकरी जॉइन करण्यासही त्यांनी सध्या नकार दिला आहे.

१५ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर नुसरत परवीन यांनी कोलकाता येथील आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. "मी शाळा आणि कॉलेजमध्ये नेहमी बुरखा घालूनच शिक्षण घेतले. माझ्यासाठी बुरखा हा केवळ कपडा नसून माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्या दिवशी कार्यक्रमात अनेक लोक उपस्थित होते, काही जण हसत होते. एक मुलगी म्हणून मला ते अपमानास्पद वाटले," असे ती म्हणाली. 

नोकरी नाकारली, भविष्यावर टांगती तलवार 

नुसरत परवीन हिला २० डिसेंबर रोजी सरकारी नोकरी रुजू करायची होती. मात्र, त्यांना आता भीती वाटत आहे. "मी खूप मेहनतीने इथवर पोहोचले होते. आई-वडिलांना मदत करण्याचे माझे स्वप्न होते, पण आता बिहारला परत जाण्याची हिम्मत माझ्यात उरली नाहीय," असे ती म्हणाली. तिचे कुटुंब तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहे, पण सध्या ती मानसिक आघातामध्ये आहे. यामुळे ती पुन्हा बिहारला नोकरी सुरु करण्यासाठी जाण्यास तयार नाहीय. 

नेमके काय घडले होते? 

पाटणा येथे एका नियुक्ती पत्रांच्या वाटप कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंचावर असलेल्या नुसरत परवीन यांच्या डोक्यावरील बुरख्याला हात लावून तो हटवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या कृत्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती, मात्र आता संबंधित पीडित महिला डॉक्टरनेच राज्य सोडल्याने नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar removes veil; doctor quits job, leaves Bihar.

Web Summary : Dr. Nusrat Parveen left Bihar after CM Nitish Kumar removed her veil at an event. Feeling humiliated, she refused a government job and moved to Kolkata, deeply affected by the incident.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार