शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार पाचव्यांदा सत्तारूढ

By admin | Updated: November 21, 2015 04:32 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करणारे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाचव्यांदा राज्याच्या

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करणारे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आणि प्रथमच आमदार झालेले तेजस्वी यादव हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात झालेल्या या शपथविधी समारंभात नितीशकुमार यांच्याशिवाय राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची दोन मुले तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यासह महाआघाडीच्या २८ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्रिमंडळात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात राजद आणि जदयूचे प्रत्येकी १२, तर काँग्रेसच्या ४ मंत्र्यांचा समावेश आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. शपथविधी समारंभात सर्वांच्या नजरा लालूपुत्रांवर खिळलेल्या होत्या. तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर शपथ घेतली.भाजपेतर पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शननितीशकुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा हा शपथविधी समारंभ म्हणजे शिवसेना, शिरोमणी अकाली दल हे भाजपप्रणीत रालोआतील घटक पक्ष तसेच भाजपेतर पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शन करणारा ठरला, असे मानले जात आहे. कार्यक्रमाला शिअदच्या वतीने पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल आणि शिवसेनेतर्फे महाराष्ट्राचे मंत्रिद्वय रामदास कदम व सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग, केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा समावेश होता.तांत्रिक कारणामुळे राहुल गांधींना विलंबराहुल गांधी यांना दिल्लीहून पोहोचण्यास विलंब झाल्याने कार्यक्रम संपण्याच्या अवघ्या २० मिनिटांपूर्वी ते समारंभस्थळी पोहोचले. गांधी यांना घेऊन येणाऱ्या विमानाने काही तांत्रिक कारणांमुळे तासभर उशिरा उड्डाण केले. राहुल यांनी स्वत: टिष्ट्वट करून ही माहिती दिली. ते व्यासपीठावर पोहोचले तेव्हा २३ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. राहुल यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी हे पाचव्या क्रमांकावर शपथ घेणार होते; परंतु वेळेत न पोहोचल्याने त्यांना सर्वात शेवटी २८ व्या स्थानावर शपथ घ्यावी लागली.लालूपुत्राने केली चूकलालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना चूक केल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. त्यांनी ‘अपेक्षित’ या शब्दाऐवजी ‘उपेक्षित’ असे उच्चारण केले. ही चूक राज्यपालांच्या लक्षात आल्याने त्यांनी तेजप्रताप यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. मुलायमसिंग यादवयांची अनुपस्थितीशपथविधी कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव आणि त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव सहभागी झाले नव्हते; परंतु मैनपुरीमधील सपाचे खासदार आणि लालूप्रसाद यांचे जावई तेजप्रतापसिंग मात्र हजर होते.बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासह एकूण २९ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यघटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळात अजूनही सात जागा रिक्त आहेत. संजद, राजद आणि काँग्रेस आपल्या नाराज नेत्यांना मंत्रिपद देऊन यांची भरपाई करू शकतात.२४३ सदस्यीय विधानसभेत १५ टक्के म्हणजे मुख्यमंत्र्यांसह एकूण ३६ मंत्री सामील होऊ शकतात. निवडणुकीतील संख्याबळानुसार राजदला १६, संजदला १४ आणि काँग्रेसला ५ मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा आहे.या मंत्र्यांनी घेतली शपथराजद...तेजस्वी यादव- उपमुख्यमंत्रीतेजप्रताप यादव- आरोग्यअब्दुल बारी सिद्दीकी- अर्थआलोककुमार मेहताचंद्रिका रायरामविचार रायशिवचंद रामअब्दुल गफूरचंद्रशेखरमुनेश्वर चौधरीअनिता देवीविजय प्रकाश

जनता दल (सं.)...विजेंद्र प्रसाद यादवराजीव रंजनसिंग ऊर्फ ललन सिंगश्रवणकुमारजयकुमार सिंगकृष्णनंदन प्रसाद वर्मामहेश्वर हजारीशैलेशकुमारमंजू वर्मासंतोषकुमार निरालाखुर्शीद ऊर्फ फिरोज अहमदमदनसिंगकपिलदेव कामत

काँग्रेस...अशोककुमार चौधरीअवधेशकुमार सिंगअब्दुल जलील मस्तानमदन मोहन झा