शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डागाळलेल्या नेत्यांच्या भाजपमधील एन्ट्रीवर गडकरींचे मोठे वक्तव्य; 'निवडणूक जिंकण्याचे राजकारण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:08 IST

राहुल गांधींनी आरएसएस आणि केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्यावर गडकरी यांनी हे अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

डागाळलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. सुरुवातीला भाजपाच विरोधी पक्षांच्या ताकदवर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते, चौकशा लावते आणि नंतर त्या नेत्यांना भाजपात घेतले जाते. या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाकडे इको फ्रेंडली साबण असल्याचे म्हटले आहे. 

आजतकच्या एका कार्यक्रमात गडकरी सहभागी झाले होते, यावेळी त्यांना यावर प्रश्न विचारण्यात आला. भाजपने बनवलेला साबण प्रत्येक डागाळलेल्या नेत्याला वॉशिंग मशीनमध्ये साफ करतो का? असे विचारले असता गडकरी आधी हसले. आमचा इको फ्रेंडली साबण आहे. बघा, राजकारणात लोक येतात आणि जातात. गोष्टी घडत राहतात. जनता पक्षापासून बघा, 47 नंतर बघा. हे सर्व असेच चालू आहे. राजकारण हा रचना, मर्यादा आणि विरोधाभासाचा खेळ आहे आणि निवडणुकीत जिंकण्याचे राजकारण सर्वात महत्वाचे आहे आणि जो जिंकतो तो सिकंदर. कधी कधी युतीत मित्र घ्यावे लागतात, लोक येतात. आम्हालाही आमची ताकद वाढवायची आहे, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले. 

मी निवडणुका पाहून काम करत नाही, रस्ते बांधले की लोक स्वतःच प्रसिद्धी करतात. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल. इलेक्ट्रिक वाहनांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, देशात इलेक्ट्रिक वाहनांची प्रतीक्षा यादी आहे. इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक मर्सिडीजही सुरू करण्यात आल्या आहेत. तुम्ही पेट्रोल आणि डिझेल वाहनावर महिन्याभरात 28 किंवा 30 हजार रुपये खर्च करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनावर 2 हजार रुपये खर्च करता आणि अशा प्रकारे तुमची एका महिन्यात 28 हजार रुपये वाचवत आहात, असे गडकरी म्हणाले. 

राहुल गांधींनी आरएसएस आणि केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्यावर गडकरी यांनी हे अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे परिपक्वतेचे लक्षण नाही. विरोधात असताना विरोध करावा लागतो, विरोधात बोलायचे असते हे मला माहीत आहे. या प्रकरणात काही तथ्य आहे, असे लोकांना वाटले पाहिजे, असे बोलण्याचा मी त्यांना सल्ला देईन असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा