नितीन गडकरी आज जळगावात
By admin | Updated: January 24, 2016 22:18 IST
मुख्य १ साठी
नितीन गडकरी आज जळगावात
मुख्य १ साठीसोबत- नितीन गडकरी यांचे छायाचित्रजळगाव, दि.२४ - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, २५ जानेवारी रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. जिल्ातील खासदारांनी मंजूर करून आणलेल्या १६ हजार ५८२ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते यावेळी होईल. २५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथून विशेष विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण होईल. दुपारी १२ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता सागरपार्क येथे जळगाव शहरातील नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण सोहळा होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता जैन इरिगेशन सिस्टीम प्रकल्पास भेट देऊन ते दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळ येथून विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.