शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आता देशातून पेट्रोल डिझेलला राम-राम ठोकण्याची आली वेळ? केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 17, 2021 14:25 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी म्हणाले, देशात विजेकडे पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन दिले जाऊ शकते. येणाऱ्या काळासाठी हा शूभसंकेत आहे.

ठळक मुद्देअनेक राज्यांमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपये प्रती लिटरच्या जवळ पोहोचले आहेत. सरकार इंधनाच्या किमती कमी करण्यावर नाही, तर नव्या पर्यायांवर भाष्य आणि विचार करत आहे.आता देशात पर्यायी इंधनाची वेळ आली असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

 नवी दिल्ली -पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपये प्रती लिटरच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, असे असताना सरकार किमती कमी करण्यावर नाही, तर नव्या पर्यायांवर भाष्य आणि विचार करत आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी देशात पर्यायी इंधनावर जोर देत भाष्य केले आहे. आता देशात पर्यायी इंधनाची वेळ आली असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी म्हणाले, देशात विजेकडे पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन दिले जाऊ शकते. येणाऱ्या काळासाठी हा शूभसंकेत आहे. गडकरी म्हणाले, आपले मंत्रालय पर्यायी ईंधनावर संपूर्ण शक्तीनीशी काम करत आहे. माझा सल्ला आहे, की आता देशात पर्यायी इंधनाची वेळ आली आहे. मी पहिल्यापासूनच, इंधन म्हणून इलेक्ट्रिसिटीला पसंती देण्यासंदर्भात बोलत आहे. कारण आपल्याकडे आवश्यकतेहूनही अधिक वीज आहे.

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार नाही टेस्ट; सरकार आणतंय नवा नियम

भारतात तायार होतायत 81 टक्के लिथियम-आयन बॅटरीज -गडकरी म्हणाले, देशात आधिपासूनच 81 टक्के लिथियम-आयन बॅटरीज तयार होत आहेत. याच बरोबर हायड्रोजन फ्यूल सेल्स विकसित करण्याचाही प्रयत्न सरकार करत आहे. अशात, आता ईंधनाच्या नव्या पर्यायांची वेळ आली असल्याचे आम्हाला वाटते. लिथियम-आयन बॅटरीच्या क्षेत्रात सध्या चीन सारख्या देशांचा दबदबा आहे. मात्र, भारत सरकारही ईंधनाच्या पर्यायांवर वेगाणे काम करत आहे. तसेच या क्षेत्रात आपला दबदबा निर्मण करण्याचा प्रयत्न करत आहे.

8 लाख कोटी रुपयांच्या जीवाश्म इंधनाची आयात -देशात सध्या 8 लाख कोटी रुपयांच्या जीवाश्म इंधनाची आयात केली जाते. गडकरी म्हणाले, जागतीक बाजारात जीवाश्म इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच भारतात तब्बल 70 टक्के जीवाश्म इंधनाची आयात होते. गडकरी म्हणाले, की "त्यांनी नुकतेच जैव-सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर लॉन्च केले आहे. आपल्याला पर्यायी इंधन उद्योगाला वेगाने वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच तामिळनाडू हे कृषी क्षेत्रातील एक महत्वाचे राज्य आहे.’’

इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; 'या' राज्यात पेट्रोल शंभरीपार, जाणून घ्या नवे दर

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकारFuel Hikeइंधन दरवाढ