शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

"माझ्या धार्मिक भावना दुखावल्या...", तडकाफडकी राजीनाम्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 19:05 IST

nisha bangre news : उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर सुट्टी न मिळाल्याने संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून रोजी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवला. त्यांना आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्कार समारंभ तसेच २५ जून रोजी त्यांच्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचे होते. पण सरकारने परवानगी नाकारली अन् त्यांनी थेट राजीनामा दिला.

निशा बांगरे यांनी दिलं स्पष्टीकरण

तडकाफडी दिलेल्या राजीनाम्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बांगरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. "२५ जूनला मला माझ्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचे आहे, तिथे आमचे काही पाहुणे येणार आहेत. सर्वधर्म शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याला उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाची परवानगी मागितली होती. मी दोनदा परवानगी मागितली होती पण परवानगी मिळाली नाही. परवानगी न दिल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि माझ्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले, त्यानंतर मला असे वाटले की मला माझे मूलभूत अधिकार मिळत नसताना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही", असे निशा बांगरे यांनी सांगितले.

दरम्यान, २५ जून रोजी मध्य प्रदेशातील बैतूल येथील आमला इथे आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि त्यांच्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी रजा मागितली होती. श्रीलंकेच्या कायदा मंत्र्यांसह ११ देशांतील सर्व धर्मांचे प्रतिनिधी शांतता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तथागत बुद्धांच्या अस्थीही श्रीलंकेतून आणण्यात येणार आहेत. पण, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

पत्राद्वारे दिला राजीनामा निशा बांगरे यांनी रजा न मिळाल्याने संतप्त होत सरकारला पत्र लिहले. "वरील विषयांतर्गत मला कळवायचे आहे की, मला माझ्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने मला दुःख झाले आहे. तसेच जागतिक शांततेचे दूत तथागत बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे दर्शन मला घेऊ न दिल्यामुळे माझ्या धार्मिक भावनांना कधीही भरून न येणारी हानी पोहोचली आहे. त्यामुळे माझे मुलभूत हक्क, धार्मिक श्रद्धा आणि घटनात्मक मूल्यांशी तडजोड करून उपजिल्हाधिकारी पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच मी आज २२-६-२०२३ रोजी तात्काळ उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत आहे", असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcollectorजिल्हाधिकारीSocial Mediaसोशल मीडिया