शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी संपत्तीच्या विक्रीचा धडाका सुरूच; मोदी सरकारकडून भलीमोठ्ठी यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 09:03 IST

पुढील ४ वर्षांत अनेक सरकारी मालमत्ता विकण्यात येणार; आज अर्थमंत्री सीतारामन योजनेची माहिती देणार

नवी दिल्ली: कोरोना संकट आणि लॉकडाऊनचा फटका बसल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करणारं मोदी सरकार निर्गुंतवणुकीवर भर देत आहे. सरकारी संपत्ती विकून त्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन (एनएमपी) योजनेची सुरुवात करतील. पुढील ४ वर्षांत मोदी सरकार कोणकोणत्या सरकारी मालमत्ता विकणार आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये असेल.

अर्थमंत्री करणार एनएमपी योजनेची सुरुवातसरकार पुढील ४ वर्षांसाठी निर्गुंतवणुकीची योजना तयार करेल. यातून गुंतवणूकदारांना स्पष्ट संदेश जाईल, अशी माहिती नीती आयोगानं काल दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज याबद्दलची अधिक माहिती देतील. सरकार येत्या ४ वर्षांत अनेक कंपन्या, पॉवरग्रीड, द्रुतगती मार्ग विकण्यात येणार आहेत.

निर्गुंतवणुकीतून ६ लाख कोटी रुपये मिळण्याचा अंदाजगुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी काही दिवसांपूर्वीच निर्गुंतवणुकीच्या योजनेची माहिती दिली होती. 'निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून जवळपास ६ लाख कोटी रुपये मिळतील, इतक्या मालमत्तांची यादी सरकारनं तयार केली आहे. एनएमपीचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी २०२१-२२चा अर्थसंकल्प मांडताना केला होता,' असं पांडेय यांनी सांगितलं. 

'निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम मुलभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी, विकास प्रकल्पांसाठी वापरला जाईल. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात मुलभूत सोयी सुविधा आणि निर्गुंतवणुकीवर सर्वाधिक भर दिला होता,' याकडेही पांडेय यांनी लक्ष वेधलं. आज अर्थमंत्री सीतारामन एनएमपी योजनेची सविस्तर माहिती देतील. यावेळी त्यांच्यासोबत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि अन्य सचिव उपस्थित असतील.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामन