शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 12:27 IST

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे मुकेश याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी रात्री  केंद्रीय गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. 

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून या दोषींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, या प्रकरणातील दोषी मुकेशची दया याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. मात्र, ही दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठविल्यानंतर या प्रकरणावर राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप निर्भयाची आई आशा देवी यांनी केला होता. "मी आतापर्यंत राजकीय चर्चा केली नाही. मात्र, आता सांगू इच्छितो की, ज्या लोकांनी 2012 मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तेच लोक आज माझ्या मुलीच्या मृत्यूवर राजकीय फायदा घेण्यासाठी खेळत आहेत", असे आशा देवी यांनी म्हटले होते. 

16 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत एका अल्पवयीन मुलासह सहा जणांनी चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला बसमधून बाहेर टाकण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाली. समाजाच्या सर्वच स्तरांमधून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. 

या प्रकरणातील चार दोषींना (विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी राम सिंहने 2015 मध्ये तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीने तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. 2015मध्ये त्याची सुटका करण्यात आली. 

आणखी बातम्या..

संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे

इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप