शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषीनं भिंतीवर वारंवार आपटलं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 09:50 IST

Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषींकडून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देविनय शर्मानं तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटलंस्वत:ला जखमी दाखवून फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्नचारही आरोपींना ३ मार्चला होणार फाशी

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीनं डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटून घेतलं. यानंतर तुरुंग प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. विनय शर्माची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र तुरुंग प्रशासनानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला. विनय शर्माच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं. विनयची मानसिक स्थिती उत्तम असून तो मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.  निर्भया सामूहिक बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या चारही खुन्यांना फाशी देण्यासाठी सत्र न्यायालयानं सोमवारी ३ मार्च ही नवी तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार विनय कुमार शर्मासह मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार यांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता दिल्लीच्या तिहार कारागृहात फाशी दिली जाईल. सत्र न्यायालयानं फाशीची तारीख निश्चित केल्यापासून चारही दोषी अतिशय आक्रमक पद्धतीनं वागत आहेत. दोषींनी आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी त्यांच्यावर तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांकडून २४ तास नजर ठेवली जात आहे. त्यांची मानसिक स्थिती योग्य राहील याची काळजी घेतली जात आहे. दोषी अतिशय हिंसक पद्धतीनं वागत असून स्वत:ला जखमी करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला गुन्हेगार जखमी किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्यास त्याची स्थिती सुधारेपर्यंत फाशीची शिक्षा पुढे ढकलली जाते. तशी तरतूद कायद्यात आहे. त्यामुळेच आपण मानसिकदृष्ट्या स्थिर, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न दोषींकडून सुरू आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप