शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! निर्भयावरील अत्याचाराची क्रूरकहाणी ऐकवण्यासाठी 'तो' वृत्तवाहिन्यांकडून घ्यायचा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 09:31 IST

डिसेंबर 2012 मध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कारकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या घटनेवेळी पीडित निर्भयासोबत असलेल्या तिच्या मित्राबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - डिसेंबर 2012 मध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कारकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या घटनेवेळी पीडित निर्भयासोबत असलेल्या तिच्या मित्राबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाच्या राजधानीत धावत्या बसमध्ये निर्भयावर झालेल्या अमानूष अत्याचाराची क्रूरकहाणी ऐकवण्यासाठी तिच्यासोबत असलेला हा मित्र विविध वृत्तवाहिन्यांकडून हजारो रुपये उकळत होता, असा दावा एका ज्येष्ठ संपादकांनी केला आहे.  तसेच मुलाखतीच्या बदल्यात पैसे घेताना त्याचे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचा दावाही या संपादकांनी केला आहे. अजित अंजूम असे या संपादकांचे नाव असून, एका वृत्तवाहिनीचे संपादक असताना निर्भायाच्या मित्राच्या  मुलाखतीच्या बदल्यात त्याच्यासमोरच त्याच्या काकांना 70 हजार रुपये दिले होते, असे ट्विट अजित अंजूम यांनी केले आहे. निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेवर आधारित वेबसीरिज दिल्ली क्राइम पाहिल्यावर मी या घटनेबाबत सार्वजनिकरीत्या लिहिलं आहे,'असे ट्विट अजित अंजूम यांनी केले आहे. दिल्ली क्राइम या वेवसीरिजमध्ये निर्भयाच्या मित्राची भूमिक नकारात्मक दाखवण्यात आली आहे. दरम्यान, निर्भयाच्या मित्राने केलेल्या या कृतीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे, ज्याच्या मैत्रिणीवर त्याच्या नरजेसमोरच असा क्रूर अत्याचार होतो. त्यात तिचा जीव जातो, असे चित्र पाहणारा माणून या घटनेची क्रूर कहाणी ऐकवून लाखो रुपये कमावण्यामध्ये गुंतला आहे, असे अंजूम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला. हे दोघं कित्येक तास विवस्त्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर पडून होते. या दरम्यान रस्त्यावरुन जाणा-या काहींनी त्यांना काही कपडे दिली व हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले.  काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली.निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.  साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं होते. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही न्यायालयाने विशेष नमूद केलं होतं. कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.  

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNew Delhiनवी दिल्लीMediaमाध्यमे