शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 15:09 IST

Nirbhaya Case : चार दोषींविरोधात नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबुधवारी दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती.चारही दोषींना 20 मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे.नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना 20 मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

बुधवारी दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. त्यामुळे चारही दोषींना लवकरच फासावर लटकवले जाणार हे निश्चित झाले होते. याशिवाय, मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या चारही दोषींना नव्या डेथ वॉरंटसाठी तिहार कारागृह प्रशासनाने बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अखेर, या दोषींविरोधात गुरुवारी अडीज वाजता डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.  

या चौघांना मंगळवारी 3 मार्च रोजी फाशी द्यायची असे आधी ठरले होते; परंतु पवन गुप्ता याने ऐनवेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी त्या दिवशीचे डेथ वॉरंट स्थगित केले होते. पवनचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर काही तासांतच फाशीच्या नव्या तारखेसाठी म्हणजेच डेथ वॉरंटसाठी अर्ज केला गेला. 

पवनचा दयेचा अर्ज हा शेवटचा होता. आता चारही खुन्यांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज कुठेही प्रलंबित नाहीत. तेव्हा नव्या तारखेचे डेथ वॉरंट लगेच जारी करावे, असा आग्रह प्रॉसिक्युटर इरफान अहमद यांनी धरला होता.मात्र, दोषींना नोटीस न देता असे वॉरंट काढणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने चारही खुन्यांना औपचारिक नोटीस काढून गुरुवारी सुनावणी ठेवली होती. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालय