शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींच्या सुरक्षेवर दररोज 50 हजारांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 09:02 IST

Nirbhaya Case : तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावत फासावर लटवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात येत आहे.तुरुंगाच्या बाहेर 32 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, फाशी देण्यासह इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत.

नवी दिल्लीः तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावत फासावर लटवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात येत आहे. तुरुंगाच्या बाहेर 32 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, फाशी देण्यासह इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रत्येक दोन तासांनी शिफ्ट बदलली जात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आराम मिळावा आणि चोख सुरक्षा व्यवस्था राबवावी, यासाठी जेल प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.चारही दोषींना तिहार तुरुंगातील जेल नंबर 3मध्ये वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक दोषीच्या बाहेर दोन सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक दोन तासांनी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना थोडी विश्रांती दिली जाते. शिफ्ट बदलल्यानंतर दुसरे सुरक्षा कर्मचारी त्यांच्याजागी पाठवले जातात. प्रत्येक कैद्यासाठी 24 तास आठ-आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे. चार कैद्यांसाठी जवळपास 32 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. ते 24 तासांत 48 तास शिफ्टमध्ये काम करत आहेत. या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधी त्यांना इतर कैद्यांबरोबर ठेवण्यात येत होते. परंतु न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ते कैदी आत्महत्या करू नये, तुरुंगातून पळून जाऊ नये,  यासाठी कैद्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.  1 फेब्रुवारीला होणार फाशीया दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार असून, 30 जानेवारीला जल्लादला बोलावण्यात आलं आहे. जेणेकरून जल्लाद फाशी देण्याचं प्रात्यक्षिक करू शकेल. बुधवारी पवन आणि विनय या दोघांच्या कुटुंबीयांनीही तुरुंग प्रशासनाची भेट घेतली आहे.  

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप