शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

नीरव मोदीची ३३० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 06:22 IST

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) हजारो कोटींना चुना लावून देशातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर ...

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) हजारो कोटींना चुना लावून देशातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईसह लंडन, युएई येथील तब्बल ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त केली.गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश ईडीला दिले होते. त्यानुसार ही कारवाई झाली. ईडीने आतापर्यंत मोदीची २३४८ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात शेकडो कोटींचे हिरे, देशविदेशाततील फ्लॅटस, कार्पोरेट कार्यालये, भूखंड आदींचा समावेश आहे. त्याच्यासह त्याचा चुलता मेहुल चोक्सी याच्यावर मनी लॉण्ंिड्रग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) गुन्हा दाखल करून फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी आर्थिक गुन्हेगारी कायद्यानुसार मोदींच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी दिली होती. एफईओ कायद्यातील तरतुदींनुसार ही मालमत्ता ईडीमार्फत एका महिन्याच्या आत जोडली जाईल, असे विशेष कोर्टाने म्हटले होते. या कायद्यांतर्गत देशात कोठेही मालमत्ता जप्त करण्याचा हा पहिला आदेश होता.अलिबागचा बंगला तोडण्याची कारवाई सुरूउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नीरव मोदीचा अलिबागजवळील कोळगाव समुद्रकिनारी असलेला १०० कोटींचा बंगला तोडण्याचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. बांधकाम मजबूत असल्याने त्यासाठी डायनामाइटचा वापर करण्यात आला होता. तेथे बघ्यांची गर्दी होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या भागात पोलीस बंदोबस्त असल्याने आणि मालमत्ता सील करण्यात आल्याने बंगल्याच्या तोडकामाचे फोटो नंतर व्हायरल झाले होते. त्यातून त्याच्या भव्यतेची कल्पना आली.या आहेत मालमत्तानीरव मोदीच्या मंगळवारी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील समुद्रमहाल या इमारतीतील चार फ्लॅट, समुद्रकिनारी फार्म हाऊस आणि अलिबागमधील जमीन, जैसलमेरमधील पवन गिरणी, लंडनमधील फ्लॅट आणि युएईमधील निवासी फ्लॅट, शेअर्स आणि बँक ठेवींचा समावेश आहे.नीरवच्या जप्त मालमत्तेतील महागड्या चित्रांचा लिलावकरण्याचा मुद्दाही असाच चर्चेत आला. त्यांच्या मुलाने ही ट्रस्टची मालमत्ता असल्याचे सांगून त्यास विरोध केला. त्यासोबतच महागडी घड्याळे, परदेशी कार, हर्मीसच्या हॅन्डबॅगचा लिलावही होऊ नये, अशी मागणी त्याने न्यायालयात केली होती. ती फेटाळली गेली.२०२९ पर्यंत ही योजनानीरव मोदीला गेल्यावर्षी मार्च २०१९ मध्ये लंडन येथे अटक झाली होती. सध्या तो ब्रिटनच्या तुरुंगात आहे आणि भारतात परतण्यास त्याचा विरोध आहे. तर मेहुल चोक्सी हा आंटिंग्वा येथे लपला असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय