शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीत नीरव मोदीनं 'अशी' साधली संधी; निकटवर्तीयांच्या मदतीनं कोट्यवधींची हेराफेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 21:49 IST

नोटबंदीनंतर नीरव मोदीकडून कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीनं नोटबंदीत कोट्यवधींची कमाई केली. नोटबंदी होताच सर्वसामान्य जनता रांगेत उभी होती. काळा पैसा पदरी बाळगणाऱ्यांना नोटबंदीनं मोठा हादरा बसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. मात्र नोटबंदीच्या निर्णयाचा नीरव मोदीनं संधी म्हणून वापर केला आणि कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा केल्याचा दावा पत्रकार पवन सी. लाल यांनी त्यांच्या 'फ्लॉड- द राईज अँड फॉल ऑफ इंडियाज डायमंड मुघल नीरव मोदी' या पुस्तकातून केला आहे. नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी दिल्लीतल्या 'गीतांजली'च्या एका ग्राहकाला एक मेसेज आला. गीतांजली नीरव मोदींच्या मालकीची कंपनी होती. 'आम्ही जुन्या नोटा स्वीकारतो', असा मेसेज गीतांजलीच्या एका ज्युनियर सेल्स असोशिएटनं ग्राहकाला पाठवला होता. हिऱ्यांच्या व्यापाऱ्यात रोख रकमेची देवाणघेवाण अतिशय सामान्य समजली जाते. मात्र नोटबंदीनंतर असा मेसेज आल्यानं गीतांजलीच्या ग्राहकाला आश्चर्य वाटलं, असा एक प्रसंग पुस्तकात आहे.  नोटबंदी झाल्यावर नीरव मोदी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी कशा पद्धतीनं काम केलं, याची माहितीदेखील लाल यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. नोटबंदीनंतर नागरिक त्यांचं ओळखपत्र दाखवून बँकांमध्ये पैसे जमा करू शकत होते. यावेळी एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पूर्वीपासूनच लाखो रुपये असल्यास प्राप्तीकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना संशय येण्याची शक्यता नव्हती. मात्र त्या व्यक्तीनं खात्यात १० लाख रुपये जमा केले असते, तर संशय येण्याची शक्यता होती. याची काळजी नीरवनं घेतली.नीरव मोदी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी नोटबंदीचा फायदा घेत त्यांच्याकडे असणारी अघोषित रोख रक्कम बँकेत जमा केली. यासाठी त्यांनी गीतांजली कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा वापर केला. नीरवनं त्याच्याकडे असणारी अघोषित रोख रक्कम कर्मचाऱ्यांना दिली. १० लाखांची रक्कम २० कर्मचाऱ्यांमध्ये वाटल्यानं प्रत्येक कर्मचाऱ्याकडे काही हजार रुपये आले. कर्मचाऱ्यांनी घरात करून ठेवलेली बचत म्हणून ही रक्कम बँक खात्यांमध्ये जमा केली. त्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात सामावून घेण्यात आली.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीDemonetisationनिश्चलनीकरणNarendra Modiनरेंद्र मोदी