गुरुवायूर : एका कॅम्पस मॅगझिनमधील कोड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या आरोपावरून केरळातील गुरुवायूर येथील श्री कृष्णा कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यांची जामिनावर सुटका झाली. अटक आणि सुटका झालेल्यांमध्ये मॅगझिनचा संपादक, उपसंपादक आणि संपादकीय सल्लागार मंडळाच्या सदस्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. कॅम्पस मॅगझिनमध्ये शब्दकोडे प्रकाशित करण्यात आले होते आणि त्यात मोदींविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर दिला होता. तो आक्षेपार्ह व असभ्य भाषेत असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. समितीने आता प्राचार्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. (वृत्तसंस्था)
केरळात मोदींविरोधी कोड्याबद्दल नऊ विद्यार्थ्यांना अटक
By admin | Updated: June 16, 2014 03:42 IST