रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका चर्चमध्ये तोडफोड करून लोकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ लोकांना अटक केली आहे. कचना गावातील ही घटना असून, पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी सहा जण अल्पवयीन आहेत.पोलीस महानिरीक्षक जी.पी. सिंह यांनी सोमवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, अटकेतील तरुणांचा जाबजबाब नोंदविणे सुरु असून ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत काय याचीही माहिती घेतली जात आहे. रविवारी चर्चमध्ये तोडफोड आणि लोकांना मारहाण होत असल्याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. परंतु पोलिसांना बघताच धुडगूस घालणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढला. दोन तरुणांची मोटारसायकल तेथेच राहिली होती. त्या आधारे नऊ जणांना अटक करण्यात आली.(वृत्तसंस्था)
चर्च हल्लाप्रकरणी नऊ लोकांना अटक
By admin | Updated: March 7, 2016 22:41 IST