शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्याला 'हे' यश बघताच आलं नाही, 'भारत बंद'च्या वेळी झाला होता निखिलचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 09:59 IST

निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत.

गाझियाबाद- एससी /एसटी कायद्याला शिथिल करण्याविरोधात 2 एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदच्या वेळी काही ठिकाणी हिंसाचारही झाला. यावेळी गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. निखिल असं त्या मुलाचं नाव आहे. पण आज निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत. पाचवीत शिकणाऱ्या निखिलने परीक्षेमध्ये टॉप केलं आहे. परीक्षेसाठी इतकी मेहनत घेतली पण ते यश पाहायला आज निखिल जिवंत नाहीये. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

कृशियन कॉलनी भागूमध्ये राहणारा निखिल भारत बंदच्या दिवशी सिब्बनपुरामध्ये राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. सकाळी जवळपास 11 वाजेच्या सुमारास तो गोशाळेपासून चालत घरी चालला होता. त्याचवेळी तिथे आंदोलकर्त्यांनी पोलिसांच्या एका बाईकला आग लावल्याने पळापळ झाली. त्या धावपळीत निखिलला कुणीतरी धक्का दिला व तो आगीत पडला, असा आरोप निखिलच्या वडिलांनी केला आहे. मुलगा आगीच्या तावडीत सापडला असल्याचं आम्ही पाहिलं लगेचच आग विझवून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असं स्थानिकांनी सांगितलं. 

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं तेव्हा पोलिसांनी आधी मुलावर उपचार करण्याचा सल्ला दिला. नंतर मुलगा बरा झाल्यावर तक्रार दाखल करू, असं पोलिसांनी सांगितलं होतं. आंदोलनादरम्यान मुलगा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी मीडियालाही दिली, असा आरोप आहे. पोलिसांनी हे सगळं मुद्दाम केलं, असा आरोप केला जातो आहे.