शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"त्या" रहस्यमय आजारामागचं गूढ उकललं; समोर आलं धक्कादायक सत्य, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 12:40 IST

Andhra Pradesh Mystery Illness : अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत.

एलरू - आंध्र प्रदेशातील एलरूमध्ये एक रहस्यमय आजार पसरल्याने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. रविवारी रात्री या रहस्यमय आजारानेबाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयात अनेक रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजाराने डॉक्टरही चक्रावले होते. मात्र आता या रहस्यमय आजारामागचं गूढ उकललं आहे.

आजारामागचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. आंध्र प्रदेशच्या एलुरू शहरात पेयजल आणि दुधात असलेल्या निकेल (nickel) आणि शिशासारखे (lead) जड तत्व हे या रहस्यमय आजाराचं कारण आहे. या आजारामुळे आतापर्यंत 500 हून अधिक लोक आजारी पडले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि राज्य, तसेच इतर केंद्रीय संस्थांच्या विशेष पथकांद्वारे शोधून काढण्यात आलेल्या कारणांच्या आधारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना आपला रिपोर्ट सादर केला आहे. 

रहस्यमय आजाराचे कारण निकेल आणि शीसे असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या एका जाहिरातीत एम्सच्या विशेषज्ञांनी तयार केलेल्या रिपोर्टच्या आधारे म्हटलं आहे. या आजारामुळे अचाननक लोक बेशुद्ध झाले, भीती वाटणे,उलटी होणे आणि पाठदुखी असे त्रास लोकांना जाणवू लागले. रुग्णांच्या शरीरात जड धातुतत्वांच्या अस्तित्वाबाबत तपास करावा आणि उपचार प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवावे असं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराने आतापर्यंत 505 लोकांना त्रास जाणवला आहे. त्यापैकी 370 लोक बरे झाले आहेत, तर इतर 120 जणांवर उपचार सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या विशेषज्ञांव्यतिरिक्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे गठीत करण्यात आलेले तीन सदस्यीय पथक मंगळवारी एलुरूला पोहोचले. या पथकाने नमुने गोळा करण्यासाठी प्रभावित भागांचा दौरा केला. या आजाराने आजारी झालेले लोक बरे होत असून घाबरण्याची काहीही आवश्यकता नसल्याचे उपमुख्यमंत्री ए. के. के श्रीनिवास यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशdoctorडॉक्टर