शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 12:58 IST

एनआयएने ५ सप्टेंबर रोजी इंदरपाल सिंह गाबा या अफगाण वंशाच्या ब्रिटिश नागरिकावर आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे.

एनआयएने खलिस्तानी विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.  मोंगा, अमृतसर, गुरुदासपूर, जालंधर आणि इतर भागात १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. गेल्या वर्षी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. लंडन हल्ल्याप्रकरणी एनआयएच्या तपासात महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी एनआयएने अफगाण वंशाच्या यूके नागरिक इंदरपाल सिंह गाबाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे.

Arvind Kejriwal Bail : मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही, फाईलवर सही करायची नाही; सहा अटी घालत अरविंद केजरीवालांना जामीन

२५ एप्रिल रोजी अटक करण्यात आलेल्या इंदरपाल सिंह गाबाला यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये लंडनहून पाकिस्तानमार्गे आल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. गाबा यांनी आंदोलनात भाग घेऊन फुटीरतावादी अजेंड्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. अमृतपाल सिंह आणि त्याची संघटना वारिस पंजाब दे यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईवर प्रभाव पाडणे हा त्याचा उद्देश होता.

भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ला हा खलिस्तानी कारण पुढे करण्याच्या मोठ्या रणनीतीचा भाग होता, अस एनआयएच्या तपासात पुढे आले आहे. लंडनचा हल्ला पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंह विरुद्ध केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला होता,  यांचा खलिस्तानचा अजेंड असल्याचा खुलासा झाला आहे. 

गेल्या वर्षी मार्चमध्ये खलिस्तान समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ घातला होता. निदर्शनादरम्यान अमृतपाल सिंह यांच्या पोस्टर्ससह खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी 'फ्री अमृतपाल सिंह', 'वीवाँट जस्टिस' आणि 'वीस्टँडविथ अमृतपालसिंह' अशा घोषणाही देण्यात आल्या. या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा