शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआयए’ने ५ देशांतून मागविली खलिस्तानी संघटनांची माहिती, आंदाेलनात परकीय सहभागाची चाैकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:16 IST

Farmer Protest : शेतकरी आंदाेलनामध्ये परकीय सहभागाची चाैकशी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच देशांमधून ‘शीख फाॅर जस्टीस’ व इतर खलिस्तानी संघटनांबाबत माहिती मागविली आहे.

नवी दिल्ली : शेतकरी आंदाेलनामध्ये परकीय सहभागाची चाैकशी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच देशांमधून ‘शीख फाॅर जस्टीस’ व इतर खलिस्तानी संघटनांबाबत माहिती मागविली आहे.शेतकरी आंदाेलनादरम्यान २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने चाैकशी करण्याचा निर्णय घेतला हाेता. खलिस्तानी चळवळीतील दहशतवादी संस्था आंदाेलनाला निधी पुरवत असल्याचे सरकारने यापूर्वीच म्हटले हाेते. त्यानुसार सरकारने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांमधून ‘एनआयए’ने माहिती मागविली आहे. परराष्ट्र सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी यासंदर्भात सांगितले, की कायदेशीर सहकार्य करारांतर्गत अमेरिकेकडे माहिती पुरविण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. शीख फाॅर जस्टीस जनमत २०२० बाबत ही माहिती अपेक्षित आहे. अशाच प्रकारे बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान टायगर फाेर्स, खलिस्तान झिंदाबाद फाेर्स यासारख्या संघटनांचे मूळ असलेल्या देशांनाही विनंती करण्यात आली आहे. शेतकरी आंदाेलनाच्या नावाखाली पाश्चिमात्य देशांमध्ये माेठ्या प्रमाणावर पैसा गाेळा करण्यात येत आहे. डेन्मार्क आणि स्वीडन येथूनही माहिती गाेळा करण्यात येत आहे. हा पैसा ‘इतर’ कामासाठी वापरण्यात येत असल्याचा ‘एनआयए’ला संशय आहे. याशिवाय दिल्ली पाेलिसांकडूनही काही साेशल मीडिया खात्यांवर नजर आहे. व्यवहार संशयास्पद?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त तपास विभागाने सुमारे २० हजार बँक खात्यांचा तपशील गाेळा केला. त्यातील संशयास्पद व्यवहारांची माहिती ‘एनआयए’ला देण्यात आली. त्यानंतर ‘एनआयए’कडून काही नावांची यादी करण्यात आली आहे. या खात्यांमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले आहेत.दोन प्रकरणांची चौकशी‘एनआयए’कडून खलिस्तानी संघटनांच्या जनमत २०२० संदर्भात दाेन प्रकरणांची चाैकशी सुरू आहे. यापैकी एक प्रकरण स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खलिस्तानी दहशतवादी संघटना भारतात पैसा पुरवीत आहे. हा पैसा भारतात अस्वस्थता निर्माण करण्याचा हेतू आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन