शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 10:53 IST

फरार दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात एकूण 19 नावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवाद्यांसंदर्भात भारत आणि कॅनडा यांच्या वादादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने  (National Investigation Agency) कारवाई तीव्र केली आहे. एनआयएने पंजाबमधील विविध शहरे आणि ठिकाणी असलेल्या 'सिख फॉर जस्टिस' या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत आणि इतर फरारी खलिस्तानी दहशतवाद्यांवर अशीच कारवाई करण्याची तयारी करत आहे. या फरार दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात एकूण 19 नावांचा समावेश आहे.

एनआयएच्या या यादीत समाविष्ट असलेली सर्व नावे भारतात मोस्ट वॉन्टेड असून त्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. या सर्व फरारी खलिस्तानींच्या भारतातील मालमत्ता UAPA च्या कलम 33(5) अंतर्गत जप्त केल्या जातील. हे खलिस्तानी दहशतवादी परदेशातून भारतविरोधी प्रचार करत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने काही दिवसांपूर्वी 43 फरारी आरोपींची यादी जाहीर केली होती. 

एनआयएच्या नव्याने जाहीर झालेल्या यादीत खालील नावांचा समावेश आहे.1.परमजीत सिंग पम्मा- ब्रिटन2.वाधवा सिंग बब्बर- पाकिस्तान3.कुलवंत सिंग मुथरा- ब्रिटन4. जेएस धालीवाल- अमेरिका5.सुखपाल सिंग- ब्रिटन6.हरप्रीत सिंग उर्फ ​​राणा सिंग- अमेरिका7.सरबजीत सिंग बेन्नूर- ब्रिटन8.कुलवंत सिंग उर्फ ​​कांता- ब्रिटन9.हरजाप सिंग उर्फ ​​जप्पी सिंग- अमेरिका10.रणजित सिंग नीता- पाकिस्तान11.गुरमीत सिंग उर्फ ​​बग्गा बाबा- कॅनडा12.गुरप्रीत सिंग उर्फ ​​बागी- ब्रिटन13.जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई14.गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया15. लखबीर सिंग रोडे- कॅनडा16.अमरदीप सिंग पूरवाल- अमेरिका17.जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा18.दुपिंदर जीत- ब्रिटन19.एस. हिम्मत सिंग - अमेरिका

गुरुपतवंत सिंग पन्नू याची मालमत्ता जप्तएनआयएने अमृतसरच्या खानकोट गावात गुरुपतवंत सिंग पन्नू याची जमीन ताब्यात घेतली आहे. ही शेतजमीन आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. त्याचे चंदीगडमधील सेक्टर १५ सी येथील घरही एनआयएने जप्त केले आहे. यापूर्वी 2020 मध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कायदेशीररित्या, पन्नू आता या मालमत्तांचे मालक नाही. या मालमत्ता आता सरकारच्या मालकीच्या आहेत. 

शीख फॉर जस्टिस संघटनेवर बंदीभारत सरकारने 2019 मध्ये गुरुपतवंत सिंग पन्नूच्या शीख फॉर जस्टिस संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी घातली होती. यासंबंधीच्या गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, शीख जनमताच्या नावाखाली शीख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहे. यानंतर, 1 जुलै 2020 रोजी, भारत सरकारने पन्नूला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले. पंजाबमधील शीख तरुणांना शस्त्रे उचलण्यास आणि फुटीरतावादासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

देशद्रोहाचे गुन्हेदहशतवादी पन्नू वेळोवेळी भारतविरोधी वक्तव्ये देत असतो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून भारतीय शीखांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आणि त्याच्या संघटनेच्याविरुद्ध भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. पंजाबमध्ये पन्नूवर देशद्रोहाचे तीन गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर पन्नूने एक व्हिडिओ जारी करून कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना भारतात परतण्याची धमकी दिली होती. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादी