शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेल कंपन्यांना 10 वर्षांपूर्वीच्या डिझेल ट्रकची माहिती देण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 13:41 IST

राष्ट्रीय हरित लवादानं देशातील प्रमुख तीन तेल कंपन्यांना जुन्या ट्रकची माहिती देण्यास सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 6 - राष्ट्रीय हरित लवादानं देशातील प्रमुख तीन तेल कंपन्यांना जुन्या ट्रकची माहिती देण्यास सांगितलं आहे. राष्ट्रीय हरित लवादानं देशातील प्रमुख तीन तेल कंपन्यांना वाहतुकीसाठी वापरणा-या 10 वर्षांपूर्वीच्या जुन्या ट्रकची माहिती देण्याचे आदेश दिलेत. इंधनाच्या वाहतुकीसाठी वापरणा-या 10 वर्षांहून जुन्या ट्रकची माहिती NGT मागवली आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रीय हरित लवादानं डिझेल रुग्णवाहिकांची पुनर्नोंदणी करण्यास सूट दिली आहे. 10 वर्षांहून जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली होती. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रात 2 हजार सीसी इंजिनच्या क्षमतेच्या डिझेल एसयूव्ही आणि इतर गाड्यांची नोंदणीवरही बंदी घातली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने नव्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवरील बंदीचा आदेश मागे घेण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही अशीच भूमिका अवलंबल्यामुळे हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही, असे लवादाने स्पष्ट केले होते. लवादाने सरसकट सर्वच नव्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवर बंदी घातली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी छोट्या डिझेल वाहनांना मनाई आदेशातून वगळले होते. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात डिझेलवर धावणाऱ्या एसयूव्ही आणि दोन हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे इंजिन असलेल्या कार आणि अन्य वाहनांच्या नोंदणीवर मात्र 31 मार्चपर्यंत बंदी कायम होती.आम्ही कुठल्याही प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाही, न्यायालयाने व्यापकरीत्या आदेश दिलेला आहे, असंही राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलं होतं. कोणतेही न्यायालय किंवा लवादाचा आदेश यात हस्तक्षेप करणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने विशेषरीत्या नमूद केले होते. आम्ही एकही शब्द बोलणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचेच पालन होईल. आम्ही कुणालाही काहीही सांगणार नाही. आम्हाला कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. आम्ही हे प्रकरण केवळ स्थगित ठेवत आहोत, असे लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंतर कुमार यांच्या नेतृत्वाने खंडपीठाने स्पष्ट केले होते.