सभागृह नेत्यांचा पराभव बातमीला जोड
By admin | Updated: March 18, 2015 23:04 IST
चौकटआम्हांला गृहित धरू नयेराष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समिती अध्यक्षपद, पीएमपी संचालक पदाबाबत काँग्रेसला दिलेला शब्द पाळला नाही. मनसेला सोबत आल्यामुळे आमच्या पक्षाची चर्चा करणे त्यांनी बंद केले होते. या कृतीतून येणार्या काळात आम्हांला गृहित धरू नये एवढेच आम्हांला सांगायचे आहे. आम्ही शब्द पाळले, मात्र त्यांनी शब्द न पाळल्याने आम्हांला हा निर्णय ...
सभागृह नेत्यांचा पराभव बातमीला जोड
चौकटआम्हांला गृहित धरू नयेराष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समिती अध्यक्षपद, पीएमपी संचालक पदाबाबत काँग्रेसला दिलेला शब्द पाळला नाही. मनसेला सोबत आल्यामुळे आमच्या पक्षाची चर्चा करणे त्यांनी बंद केले होते. या कृतीतून येणार्या काळात आम्हांला गृहित धरू नये एवढेच आम्हांला सांगायचे आहे. आम्ही शब्द पाळले, मात्र त्यांनी शब्द न पाळल्याने आम्हांला हा निर्णय घ्यावा लागला.- अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेताचौकटमहापालिकेतील समीकरणे बदलणारपीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सभागृह नेते सुभाष देशमुख यांचा पराभव केल्याने महापालिकेतील आगामी दोन वर्षातील समीकरणे बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात झालेल्या अलिखित करारानुसार पाचही वर्षांचे महापौरपद, शिक्षण मंडळ अध्यक्षपद, पहिल्या तीन वर्षांचे आणि पाचव्या वर्षांचे स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. तर कॉंग्रेसला पाच वर्ष उपमहापौरपद, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्षपद आणि चौथ्या वर्षाचे स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि एक वर्ष पीएमपीचे संचालकपद देण्याचे ठरले होते. आता काँग्रेसने राष्ट्रवादीची साथ सोडल्याने मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी महापालिकेत पहायला मिळण्याची शक्यता आहे.