शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यूज क्लिकचे मुख्य संपादक आणि एचआर प्रमुखाला अटक; देशाविरोधात चीनचा पैसा घेतल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 21:00 IST

दिल्ली पोलिसांची मोठी टीम आज सकाळपासून जवळपास ३० ठिकाणांवर चौकशीसाठी पोहोचली होती.

चीनमधून पैसा पुरविला गेल्याच्या आरोपांखाली न्यूज क्लिक या बातम्या देणाऱ्या वेबसाईटच्या कार्यालयासह पत्रकारांवर आज दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली. यानंतर आता उशिरा न्यूजक्लिक मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. 

दिल्ली पोलिसांची मोठी टीम आज सकाळपासून जवळपास ३० ठिकाणांवर चौकशीसाठी पोहोचली होती. यावेळी पोलिसांनी न्यूज क्लिकच्या ८ ते ९ पत्रकारांची चौकशी केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आदी गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. काहींना पोलीस ठाण्यात चौकशी साठी नेण्यात आले होते. तर काहींच्या घरीच चौकशी करण्यात आली होती.

यामध्ये  अभिसार शर्मा, प्रबीर पूरकायस्थ, भाषा सिंह, उर्मिलेश, सोहेल हाश्मी आदी पत्रकार होते. चीनकडून होणाऱ्या फंडिगबाबत आणि त्यातून काही देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली होती. आता रात्री उशिरा न्यूजक्लिक मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी न्यूज क्लिकचे कार्यालयही बंद केले आहे. 

5 ऑगस्ट 2023 रोजी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती. यामध्ये नेविली रॉय सिंघम हा अमेरिकन नागरिक चीनसाठी काम करत असल्याचा आणि देशातील संस्थांना पैसे पुरवत असल्याचा दावा करण्यात आला होता. भारतात न्यूजक्लिकला त्याने पैसे पुरविल्याचा आरोप होता. भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी  लोकसभेत काँग्रेस, चीन आणि काही पत्रकार हे त्रिकूट मिळून देशविरोधी कारवाया असल्याचा आरोप केला होता.  

टॅग्स :chinaचीन