शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तवाहिन्यांनीही गुगलकडे मागितला बातम्यांचा माेबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:46 IST

‘एनबीए’चे गुगलला पत्र, भारतातही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील वृत्तपत्रांनंतर आता वृत्तवाहिन्यांनीही  गुगलकडे बातम्यांचा माेबदला मागितला आहे. जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातील याेग्य वाटा मिळावा, अशी मागणी गुगलकडे करण्यात आली आहे. वृत्तवाहिन्यांची संघटना ‘न्यूज ब्राॅडकास्टर्स असाेसिएशन’ (एनबीए)ने गुगलला याबाबत पत्र लिहिले आहे

संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी गुगल इंडियाचे देश व्यवस्थापक संजय गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. त्यात शर्मा यांनी सांगितले की, डिजिटल वृत्त व्यवसायावर जाहिरातींच्या महसुलाच्या अयाेग्य वितरणामुळे प्रचंड ताण आला आहे. या महसुलातील माेठा वाटा तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगलसारख्या बड्या कंपन्या घेतात. त्यामुळे वृत्त वाहिन्यांचा महसूल माेठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे गुगलने बातम्यांसाठी याेग्य माेबदला द्यावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये विधेयक पारित करण्यात आले हाेते. त्यानुसार साेशल मीडिया कंपन्यांना स्थानिक बातम्या दाखविण्यासाठी पैसे माेजावे लागणार आहेत.

‘आयएनएस’ने केली हाेती मागणी भारतीय वृत्तपत्र संघटनेचे (आयएनएस) अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी काही दिवसांपूर्वी संजय गुप्ता यांना पत्र लिहून गुगलकडे बातम्यांचा याेग्य माेबदला देण्याची मागणी केली हाेती. ऑनलाइन बातम्यांद्वारे मिळणाऱ्या महसुलातील वाटा ८५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली हाेती. तसेच महसूल वितरणामध्ये अधिक पारदर्शकता आणावी, असेही गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले हाेते. 

टॅग्स :googleगुगल