शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन; कोरोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 13:44 IST

रोहित सरदाना यांच्या निधनानं माध्यम क्षेत्रात शोककळा; अनेकांकडून दु:ख व्यक्त

नवी दिल्ली: प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. झी न्यूजमध्ये प्रदिर्घ काळ काम केलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये कार्यरत होते. झी न्यूजमध्ये वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या सुधीर चौधरींनी सरदाना यांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली. कोरोना विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती, असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे हात थरथरू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदाना यांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. हा विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवानं केलेला अन्याय आहे. ओम शांती,' असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. वृत्तवाहिन्यांमधला प्रसिद्ध चेहरा असलेले रोहित सरदाना आज तक वृत्तवाहिनीच्या 'दंगल' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचे. २०१८ मध्ये त्यांचा गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीदेखील सरदाना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'मित्रांनो, अतिशय वाईट बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या