शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बालकाचाही बनणार आयुष्मान भारत हेल्थ आयडी; १८ वर्ष वाट पाहण्याची झंझट संपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:36 IST

आता नवजात बालकाचाही आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) नंबर असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवजात बालकाचाही आता हेल्थ आयडी तयार करता येणार आहे.

आता नवजात बालकाचाही आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) नंबर असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवजात बालकाचाही आता हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. जन्म घेताच बालकाचा एक हेल्थ आयडी तयार करण्यात येईल. यातून बालकाचे पालक आपल्या मुलाच्या आरोग्याचा रेकॉर्ड ट्रॅक करू शकणार आहेत. यासोबतच आपल्या मुलाला कोणत्याही डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल किंवा रुग्णालयात न्यायचं असेल तर हेल्थ आयडीमुळे अनेक प्रकार मदत प्राप्त होऊ शकणार आहे. नॅशनल हेल्थ मिशन लहान मुलांचा हेल्थ आयडी तयार करण्याच्या मॅकेनिझमवर काम करत आहे. नवी प्रणाली अंमलात आणली गेली की आई-वडील आपल्या नवजात बालकाचा हेल्थ आयडी तयार करू शकणार आहेत. 

आयुष्मान भारत अकाऊंट नंबर तयार करण्यात आल्यानंतर आई-वडील आपल्या मुलाचं हेल्थ रेकॉर्ड त्याच्या जन्मावेळीच अपलोड करू शकणार आहेत. हेल्थ आयडीसोबतच आणखी अनेक सुविधा या माध्यमातून मिळवता येणार आहेत. जसं की बालकाला कोणकोणत्या आयोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्याच्या नावे कोणती इन्श्युरन्स स्कीम आहे आणि संबंधित बालकावर खासगी किंवा सरकारी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे उपचार झाले आहेत या सर्व बाबी हेल्थ अकाऊंटवर अपडेट करता येणार आहेत. सध्या फक्त १८ वर्षांवरील व्यक्तींनात आयुष्मान भारत अकाऊंट नंबर बनवता येतो. पण नव्या नियमानुसार नवजात बालकांचंही आयुष्मान भारत हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. 

बालकांच्या हेल्थ आयडीचा फायदा काय?एका सरकारी अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार आई-वडीलांना आपल्या पाल्याच्या जन्मापासूनच त्याचा हेल्थ रेकॉर्ड ट्रॅक करता यावा आणि आरोग्य सुविधा पाल्याच्या जन्मापासूनच मिळायला हव्यात यासाठी हेल्थ आयडी फायदेशीर ठरणार आहे. जेव्हा कोणताही नवजात बालकाचा जन्म होतो तेव्हा त्याचा कोणताही आयडी नसतो. तसंच कोणताही अधिकृत कागदोपत्री पुरावा देखील नसतो. नवजात बालकाच्या जन्म प्रमाणपत्र बनविण्यासाठी देखील ३० दिवसांचा वेळ जातो. आता आई-वडील आपल्या हेल्थ आयडीला आपल्या नवजात बालकाच्या आयडीशी लिंक करू शकणार आहेत. यात जन्मावेळी आपल्या बालकाची हेल्थ हिस्ट्री पालकांना पाहता येणार आहे. भविष्यात वैद्यकिय उपचारांसाठी या माहितीचा खूप फायदा होऊ शकणार आहे. 

हेल्थ आयडी कसा बनणार?नवजात बालकाचा आयडी त्याच्या आई-वडीलांच्या हेल्थ आयडशी लिंक असणार आहे. यात आई-वडील आपल्या मुलाचं हेल्थ आयडी पाहू शकतील किंवा इतर कुणाला दाखवायचं असेल तर त्याची अनुमती तेच देऊ शकतील. मुल जोवर १८ वर्षांचं होत नाही तोवर त्याचा हेल्थ आयडी आई-वडिलांच्या अकाऊंटशीच लिंक राहील. नॅशनल हेल्थ मिशनच्या या नव्या प्रोजेक्टवर येत्या काही महिन्यात काम सुरू केलं जाणार आहे. आई-वडील विविध माध्यमातून हेल्थ आयडी तयार करू शकणार आहेत. यासाठी आयुष्मान भारत डिजीटल मिशन वेबसाईट, आयुष्मान भारत योजनेशी निगडीत रुग्णालयं, आरोग्य सेतू मोबाइल अॅप, पेटीएम अॅप, हेल्थकेअर प्रोव्हाडर आणि सरकारी हेल्थ स्कीमची मदत घेतली जाणार आहे. यांच्या माध्यमातून हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. 

टॅग्स :new born babyनवजात अर्भकayushman bharatआयुष्मान भारत