शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात सूर्य, चंद्राचे होणार अनोखे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 02:45 IST

सुट्ट्यांची चंगळ; चार गुरुपुष्ययोग, वर्षभरात एकही अंगारकी चतुर्थी नाही, २0२0 लीप वर्ष

मुंबई : बुधवारपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्ष २०२० मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असेल. लीप वर्ष असल्याने कामासाठी वर्षात एक दिवस जास्त असेल. खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शन, ब्लू मून योग, सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी चार गुरुपुष्य योग असतील. तसेच या वर्षात अश्विन अधिकमास असेल, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले की, नूतन वर्ष २०२०मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि चार चंद्रग्रहणे म्हणजे एकूण सहा ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही भागांतून दिसेल. उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. १४ डिसेंबरला होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. १० जानेवारी व ५ जूनचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसेल, तर ५ जुलै व ३० नोव्हेंबरचे छायाकल्प चंद्रग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. सोने खरेदी करणाºयांसाठी नवीन वर्षात २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर असे चार गुरुपुष्य योग आहेत. या नवीन वर्षात एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नसेल. २०२०मध्ये १८ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबर या काळात अधिक अश्विनमास असेल. त्यामुळे गणेशोत्सवाचा भाद्रपद महिना झाल्यानंतर नवरात्र-घटस्थापना एक महिना उशिरा येणार आहे. त्यामुळे दसरा-दिवाळी हे सणही उशिरा येतील. २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस असतील. कामांची पूर्तता करण्यासाठी १ दिवस जास्त मिळेल.‘ब्लू मून’ची पर्वणी७ एप्रिल रोजी रात्री आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लक्ष ५६ हजार ९०७ किमी. इतका पृथ्वीजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसेल. नवीन वर्षी १ व ३१ आॅक्टोबर अशा दोन पौर्णिमा आल्यामुळे ३१ आॅक्टोबरला ‘ब्लू मून’ योग आला आहे.वर्षभरात २४ सुट्ट्याप्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), पारसी नवीन वर्ष (१६ आॅगस्ट), मोहरम (३० आॅगस्ट), विजयादशमी (२५ आॅक्टोबर) या चारच सुट्ट्या रविवारी येतील. इतर २० सुट्ट्यांपैकी बकरी ईद (१ आॅगस्ट), स्वातंत्र्य दिन (१५ आॅगस्ट), श्रीगणेश चतुर्थी (२२ आॅगस्ट), दिवाळी लक्ष्मीपूजन (१४ नोव्हेंबर) या सुट्ट्या शनिवारी-रविवारच्या सुट्टीला जोडून येणार आहेत. तसेच श्रीमहावीर जयंती (६ एप्रिल), रमजान ईद (२५ मे), दिवाळी बलिप्रतिपदा (१६ नोव्हेंबर), गुरुनानक जयंती (३० नोव्हेंबर) या सुट्या सोमवार, रविवारला जोडून येतील.