शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोनाच्या नव्या लक्षणांमुळे मेंदूचा सखोल अभ्यास व्हावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:42 IST

डॉ. योगिता अडलखा यांनी विकसित केले मानव आधारित मॉडेल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या घातक परिणामांशी जग लढत असताना सार्स कोव्ह-२ ने कोरोनानंतर आरोग्याच्या अनेक गुंतागुंती निर्माण केल्या, त्यात विस्मरणाचे (अल्झायमर) प्रमाण वाढण्यासारख्या आकलनविषयक दोषांचा समावेश आहे. या नव्या लक्षणांमुळे मेंदूचा अभ्यास क्षेत्रात सखोल संशोधनाची गरज निर्माण झाली आहे.डॉ. योगिता अडलखा या भारतीय संशोधकाने मेंदूतील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी मानव-आधारित नमुना विकसित केला आहे. या नमुन्यामुळे मज्जातंतूंतील बिघाडांचा अधिक चांगला अभ्यास करता येऊ शकेल. मानव-आधारित हे मॉडेल अशाप्रकारचे पहिलेच असून, ते आत्मकेंद्रीपणासारख्या (ऑटिझम) मेंदूतील बिघाडांवर उपचारांची रचना करण्यास मदत करू शकते.डॉ. योगिता अडलखा या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थशी संबंधित असून त्यांनी मानवी वैशिष्ट्ये असलेल्या मेंदूच्या पेशी या थेट रुग्णाच्या रक्तातून निर्माण करण्यात यश मिळवले आहे. “प्रत्यक्षात मानवी मेंदूची पुनरावृत्ती करू शकेल अशा मॉडेल्सचा विकास होणे ही काळाची गरज आहे”, असे डॉ. योगिता अडलखा म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, “घडवून आणलेल्या प्लुरिपोटेंट स्टेम सेल्सचे रूपांतर टिश्यू कल्चर डिशमध्ये मज्जातंतू स्टेम पेशींत करण्यात आले. या पेशी मज्जातंतू स्टेम पेशीसारखे वर्तन करतात”.आतापर्यंतचा मज्जातंतू विज्ञानविषयक (न्यूरोलॉजिकल) अभ्यास आणि मेंदू कसे काम करतो, याची आम्हाला असलेली समज ही एक तर मेंदूच्या नमुन्यांची किंवा जनावरांच्या मॉडेल्सची केलेली चिकित्सा याच्या आधारावरील आहे. या मॉडेल्सनी गुंतागुंतीच्या मज्जातंतू हालचाली समजून घेण्याची समज वाढवण्यात मदत केली असली तरी हे मॉडेल्स औषध विकसित करण्यात यशस्वी ठरले नाहीत. स्टेम सेल टेक्नॉलॉजीजनावरांच्या मॉडेल्सवर ज्या औषधांच्या चाचण्या यशस्वी ठरल्या, त्या वैद्यकीय चाचण्यांत अयशस्वी ठरल्या. त्यामुळे प्रत्यक्षात मानवी मेंदू, त्याची कार्ये आणि आजार यांची नक्कल करू शकेल, अशी मॉडेल्स विकसित होणे ही नेहमीची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि याचे उत्तर आहे स्टेम सेल टेक्नॉलॉजी, असे डॉ. अडलखा म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या